कोलंबो : DRS म्हणजे धोनी रिव्ह्यू सिस्टिम असं म्हणायचीच वेळ आता आली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टिममध्ये धोनीचा अंदाज हा पुन्हा एकदा बरोबर आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये जसप्रीत बुमराहनं निरोशन डिकवेलाला एलबीडब्ल्यू केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिकवेलाच्या पायाला बॉल लागल्यावर भारतीय खेळाडूंनी अपील केलं पण अंपायरनं डिकवेलाला नॉट आऊट दिलं. यानंतर बुमराहनं कॅप्टन कोहलीला डिसिजन रिव्ह्यू घ्यायला सांगितला पण कोहलीनं याबाबत धोनीला विचारलं. धोनीनं होकार दिल्यावर मग कोहलीनं हा रिव्ह्यू घेतला आणि डिकवेलाला आऊट देण्यात आलं. 


श्रीलंकेविरुद्धची तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा शानदार विजय झाला. या विजयाबरोबरच ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं ३-०नं विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नाबाद १२४ रन्स आणि धोनीच्या नाबाद ६७ रन्समुळे भारताचा विजय सोपा झाला. रोहित शर्माचं हे १२वं शतक होतं. रोहितच्या या इनिंगमध्ये १६ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.