लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफी संपण्याआधी टीम इंडियाला मुख्य प्रशिक्षक मिळेल. सध्याचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा कार्यकाल चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संपतोय. त्यामुळे नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये वनडे सीरिजमध्ये खेळण्यास जाऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना होण्याच्या एक दिवस आधी विराट कोहलीने बीसीसीआयच्या सल्लागार समितीतील दोन सदस्यांची भेट घेत त्यांना प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रींच्या नावाचा विचार करण्याची शिफारस केली होती. 


दरम्यान, शास्त्री यांनी मुख्य प्रशिक्षपदासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते या शर्यतीतून बाहेर आहेत. मात्र बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, बोर्डाच्या प्रशासकीय समितीने सल्लागार समितीला हा अधिकार दिलाय की ते शास्त्रींना मुलाखतीसाठी बोलवू शकतात. त्यामुळे हे शक्य होईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यातच यावेळी प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीमध्ये कोहलीचे मत ग्राह्य नसणार आहे.