Virat kohli on MS dhoni: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat kohli) सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. मात्र, गेल्या मागील वर्षांपर्यंत विराटची बॅट तळपत नव्हती. त्यावेळी विराटवर मोठ्या प्रमाणात टीका होती होती. त्यावेळी विराटला अनेकांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (MS dhoni) विराटला मॅसेज केला होता. त्यावर आयसीबीच्या पॉडकास्टमध्ये ( RCB Postcast) बोलताना विराट भावूक झाल्याचं पहायला मिळालं.


काय होता धोनीचा मॅसेज?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा तुम्ही बलवान असण्याची अपेक्षा केली जाते आणि एक मजबूत व्यक्ती म्हणून पाहिले जाते, तेव्हा लोक तुम्ही कसे आहात हे आपल्याला विचारत नाहीत, असा धोनीने मॅसेज (MS dhoni massage to Virat Kohli) केला होता.


विराट म्हणतो...


माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे, माझी मानसिकता खूप मजबूत असं वाटतं आणि कोणत्याही परिस्थितीला हाताळू शकतो तसेच सहन करू शकतो आणि कोणत्याही परिस्थितीत मार्ग शोधू शकतो, अशी माझ्याप्रती सर्वांचा समज आहे, असं विराट (Virat Kohli) म्हणतो.


कधीकधी, तुम्हाला असं वाटतं की, एक माणूस म्हणून जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर तुम्हाला काही पावलं मागं जाण्याची गरज असते. त्यावेळी समजून घ्या की, तुम्ही कसे आहात, तुमचं हित कशात आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे, असंही विराट (Virat Kohli) म्हणाला आहे.


पाहा काय म्हणालाय Virat Kohli -



आणखी वाचा - Virat Kohli ला झालंय तरी काय, MS Dhoni संबंधित विचित्र पोस्ट शेअर, जाणून घ्या प्रकरण?


दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने (MS dhoni) माझी कर्णधार म्हणून निवड केली, वयाच्या 23 व्या वर्षापासून मी त्याचा उपकर्णधार होतो, त्यामुळे आमच्यामध्ये खूप आदर निर्माण झाला, असंही विराट म्हणाला आहे. कोहलीने 11 वर्षी धोनीसोबत भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2008 ते 2019 या काळात दोन्ही खेळाडूंनी मोलाची कामगिरी केली होती.