Virat Kohli Birthday in Melbourne: भारताचा स्टार खेळाडू असलेल्या विराट कोहलीचा (Virat Kohli) आज 34 वा वाढदिवस आहे. विराट कोहलीला क्रिकेट विश्वात रन मशीन, किंग कोहली या नावाने ओळखले जाते. विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे त्याचे जगभरात चाहते आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया येथे टी 20 विश्वचषक सुरु असून विराट कोहली भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी करीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त कालपासूनच सोशल मीडियावर (Social Media) चाहत्यांकडून #HappyBirthdayViratKohli, #ViratKohliBirthdayCDP, #ViratKohli या हॅशटॅगच्या (Hashtag) शुभेच्छा येत आहेत. याचवेळी मेलबर्नमधील सहकाऱ्यांकून विराट कोहलीचा जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला.  


SF मध्ये जाण्यासाठी मुख्य सामने


भारतीय संघ आता 6 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध (Ind vs Zim) सामना खेळणार आहे. T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील ग्रुप-2 मधील हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. रोहित शर्माच्या  (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाने हा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल. झिम्बाब्वे जिंकला तर भारतासाठी कठीण होईल.


वाचा : हीच ती वेळ! श्रीलंका ऑस्ट्रेलियाच्या उपकाराची परतफेड करणार का? जाणून घ्या सेमीफायनचं गणित 


मेलबर्नमधील याच मैदानावर 23 ऑक्टोबर रोजी विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी करताना भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता. अशा स्थितीत भारतीय क्रिकेटप्रेमींना या मैदानावर विजयाची अपेक्षा आहे. टीम इंडिया सध्या 6 गुणांसह गटात अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.



विराटचा जल्लोषात वाढदिवस साजरा 


भारतीय संघाचा माजी कर्णधार, King Kohli ने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड (t20 world cup 2022 ) कप स्पर्धेत विराटची बॅट ही प्रतिस्पर्धींना चांगलीच झोडून काढत आहे. पाकिस्तानविरुद्धची विराटची खेळी ही त्याच्या कारकीर्दितील सर्वोत्तम ठरली. आता चाहत्यांना भारताने ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा 15 वर्षांचा दुष्काळ संपवावा, अशी आस लागली आहे. पण, आज भारतीय संघ मेलबर्नमध्ये विराटचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी सज्ज असताना शनिवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. 


वाचा : झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नका; Team India मोठ्या फरकाने सामना जिंकली नाही, तर...  


विराटची चमकदार कारकीर्द


विराटची कारकीर्द चमकदार आहे आणि त्याने एकट्याने अनेक प्रसंगी टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या कोहलीने आतापर्यंत 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्‍याच्‍या नावावर कसोटीमध्‍ये 27 शतके, 28 अर्धशतकांसह 8074 धावा आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये 43 शतके आणि 64 अर्धशतकांसह 12344 धावा आहेत. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने एक शतक आणि 36 अर्धशतके झळकावली, ज्यामुळे त्याने एकूण 3932 धावा केल्या आहेत.