T20 World Cup : हीच ती वेळ! श्रीलंका ऑस्ट्रेलियाच्या उपकाराची परतफेड करणार का? जाणून घ्या सेमीफायनचं गणित

England vs Sri lanka T20 World Cup: आज मिळणार उपांत्य फेरीतील दुसरा संघ, इंग्लंड जिंकताच ऑस्ट्रेलियाचा संघ बाहेर पडणार...

Updated: Nov 5, 2022, 11:05 AM IST
T20 World Cup : हीच ती वेळ! श्रीलंका ऑस्ट्रेलियाच्या उपकाराची परतफेड करणार का? जाणून घ्या सेमीफायनचं गणित   title=

England vs Sri lanka :  घरच्या मैदानात असलेल्या टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियावर सेमीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचे संकट निर्माण झाले आहे. सुपर 12 मधील ग्रुप 1 मधील आपल्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत केले. मात्र आज (5 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाचे यजमानपद असलेल्या T20 विश्वचषक 2022 च्या सुपर-12 मध्ये आज ग्रुप-1 चा शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सिडनी येथे होणार आहे. इंग्लंडला सेमीफायनल गाठण्यासाठी या सामन्यात फक्त विजय आवश्यक आहे. त्यामध्ये पण जर इंग्लंड जिंकला तर ऑस्ट्रेलिया बाद होईल. (England vs Sri lanka T20 World Cup semi final)

T20 विश्वचषक 2022 चा हंगाम आता सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. न्यूझीलंड हा या मोसमातील पहिला सेमीफायनचा संघ ठरला आहे. तर दुसऱ्या संघाचा निर्णय आज होणार आहे. हा दुसरा सेमीफायनल फेरीतील संघ इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया असू शकतो. सुपर-12 मध्ये ग्रुप-1 मध्ये आज (5 नोव्हेंबर) सिडनीमध्ये इंग्लंड आणि श्रीलंका (England and Sri Lanka) यांच्यात सामना रंगणार आहे. इंग्लंडला सेमीफायनल गाठण्यासाठी या सामन्यात फक्त विजय आवश्यक आहे. जर इंग्लंड जिंकला तर ऑस्ट्रेलिया बाद (England win then Australia out) होईल. तसेच, इंग्लंड गट 1 मधून न्यूझीलंडसह पात्र ठरेल.

वाचा : IPS अधिकाऱ्याविरोधात MS Dhoni ची याचिका; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सेमीफायनलसाठी इंग्लंडला आज फक्त विजयाची गरज 

जर श्रीलंकेने हा सामना जिंकला तर तो आणि इंग्लंड दोघेही बाद होतील. अशावेळी ऑस्ट्रेलिया गट 1 मधून न्यूझीलंडसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. ग्रुप-1 मध्ये सध्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे 7-7 गुण आहेत. उत्कृष्ट नेट रनरेटमुळे किवी संघ आधीच पात्र ठरला आहे.

तर इंग्लंडचे केवळ 5 गुण आहेत, परंतु नेट रन रेट ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला आहे. अशा स्थितीत इंग्लंड संघाने श्रीलंकेला हरवल्यास त्यांचे 7 गुण होतील आणि ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. तर ऑस्ट्रेलियन संघ 7 गुण असूनही खराब नेट रनरेटमुळे बाहेर पडेल.

वाचा : 'रन मशीन' कोहली आज चाहत्यांना कोणतं गिफ्ट देणार? जाणून घ्या... 

T20 विश्वचषकासाठी इंग्लंड आणि श्रीलंकेचा संघ

इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड .

राखीव खेळाडू: टायमल मिल्स, लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लेसन.

श्रीलंकेचा संघ : दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुनाथिलक, पथुम निसांका, कुसल मेंडिस (डब्ल्यूके), चरित अस्लांका, भानुका राजपक्षे (डब्ल्यूके), धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिश टेकशाना, जेफ्री वांडर्से, चमिका करुणा, कुमार दशमन, कुमारी दुष्मंथा, बिनुरा फर्नांडो, प्रमोद मदुशन.

स्टँडबाय: अशेन बंदारा, प्रवीण जयविक्रम, दिनेश चंडिमल, बिनुरा फर्नांडो आणि नुवानिंदू फर्नांडो.