पोर्ट ऑफ स्पेन : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने पाकिस्तानच्या जावेद मियांदाद यांचा २६ वर्ष जुना विक्रम मोडित काढला आहे. विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम जावेद मियांदाद यांच्या नावावर होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जावेद मियांदाद यांनी विंडिजविरुद्धच्या ६४ वनडे सामन्यांमध्ये १९३० रन केल्या होत्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेआधी विराटला हा विक्रम मोडण्यासाठी १९ रनची गरज होती. विराट कोहलीने ३४ वनडे मॅचमध्येच या विक्रमाला गवसणी घातली आहे.


याचबरोबर विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधलं त्याचं ४२वं शतक पूर्ण केलं आहे. वनडेमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या वनडे कारकिर्दीत ४९ शतकं केली होती. सचिनचा हा विक्रम मोडायला विराटला ८ शतकांची गरज आहे.