मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. विराट कोहलीकडून उत्तम खेळ खेळला जात नाही. एकेकाळी शतकावर शतक करणारा खेळाडू गेल्या दोन वर्षांपासून एकही शतक करू शकलेला नाही. 


विराटने पहिल्यांदा सोडलं मौन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीचा विश्वास आहे की त्याला स्वत:ला कुणाकडेही सिद्ध करण्याची गरज नाही.  तो त्याच्या खेळावर खूप खूश आहे. दुखापतीमुळे कोहली दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. त्याच वेळी, तो खराब फॉर्ममधून जात आहे आणि नोव्हेंबर 2019 पासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केले नाही. कोहली म्हणाला, 'खरं तर माझ्या कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ नाही आणि अनेकदा असं घडलं आहे.


2014 मध्ये, जेव्हा मी इंग्लंडमध्ये खेळत होतो, तेव्हाही अशा गोष्टी निर्माण झाल्या होत्या की मला नीट खेळता येत नाही आणि मी शतकही करू शकत नाही.  त्यामुळे मैदानाबाहेर काय चालले आहे, याने त्यांना काही फरक पडत नाही.


दोन वर्षांपासून शतकापासून लांब 


27 कसोटी शतके झळकावणारा कोहली म्हणाला, “कधीकधी खेळातील गोष्टी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने घडत नाहीत, पण एक खेळाडू आणि फलंदाज म्हणून मी गेल्या वर्षभरात खूप महत्त्वाच्या क्षणांमध्ये आणि भागीदारीत सहभागी होतो." अखेर, अनेक कसोटी सामन्यांमध्ये ते क्षण आमच्यासाठी निर्णायक ठरले आहेत.


कधीकधी तुमचा केंद्रबिंदू बदलतो, जर तुम्ही संख्या आणि यशाच्या आधारावर स्वतःकडे पाहिले तर तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्ही कधीही आनंदी किंवा समाधानी होणार नाही, असं देखील विराट यावेळी म्हणाला. फलंदाज म्हणून पुढे काय विचार करतो, याचीही माहितीही विराट कोहलीने यावेळी दिली. 


कोहली म्हणाला, "मी ज्या प्रकारे खेळत आहे त्याबद्दल मला आनंद तर आहेच. पण त्यासोबत मला खूप अभिमान वाटतो. कारण संघातील प्रभावी कामगिरीशी मला सलग्न राहायचे आहे. तसेच नेहमी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करायचे आहेत." मला खरोखरच विश्वास आहे की मला कोणाकडेही स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही कारण मी माझ्या खेळात खूश आहे.


रहाणे - पुजराच्या कामगिरीवर कोहलीचं मत 


चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे वरिष्ठ फलंदाज संघात आणणारा अनुभव अमूल्य असल्याचेही कोहली म्हणाला. त्यांच्या अनेक कसोटी डावांनंतर, पुजारा आणि रहाणे या दोघांनी जोहान्सबर्ग येथे दुसऱ्या डावात अनुक्रमे 53 आणि 58 सह 111 धावांची भागीदारी केली होती.