मुंबई : आज विराट कोहलीचा बर्थ डे आहे. आपला हा धडाकेबाज कॅप्टन आज ३१ वर्षांचा झालाय. भूतानमध्ये अनुष्कासोबत तो आपला बर्थडे साजरा करतोय. 'हॉट कॅप्टन' आज बर्थ डेलाही सोशल मीडियावर फटकेबाजी करतोय. विराट प्रचंड आहे.... टीम इंडियाचा कॅप्टन आणि आधारस्तंभ... विराट म्हणजे प्रचंड एनर्जी, विराट म्हणजे बेदरकारी आणि विराट म्हणजे डिसीप्लिन... असं भन्नाट कॅरेक्टर असलेला हा विराट यंग एनर्जेटीक नव्या भारताचा चेहरा बनलाय. धावांची बरसात करायला त्याला मान्सूनची गरज भासत नाही. तो मैदानावर आला की धावांचा पाऊस धोधो बरसतो. फिल्डवर असला की आक्रमकता हीच त्याची बॉडी लँग्वेज असते. याच आक्रमकतेच्या जोरावर वयाच्या ३१ व्या वर्षी तो अनेक विक्रमांचा बादशहा झालाय. म्हणूनच आज तो बर्थ डेला किंग कोहली म्हणून सोशल मीडियावर ट्रेन्डिंगवर आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटची वाट वेगळी आहे. म्हणूनच बर्थडेच्या दिवशी भूतानला अनुष्का सोबत आठ-आठ किलोमीटरची पायपीट करतोय. ते दोघेही अगदी लोकल झालेत. ग्लोबल सेलिब्रेटी कपलचं हे लोकल होणंच सोशल मीडियाला जास्त भावलंय.  



'ब्रॅन्ड विराटही' मोठा झालाय... जगभरातले सर्वच ब्रॅन्ड आज विराटसोबत जोडू इच्छितात. या नव्या 'मास्टर-ब्लास्टर'सोबत त्यांना करार करायचे आहेत. सचिन एक्टीव असतानाचे सर्वच ब्रॅन्ड आता विराटकडे डायव्हर्ट झालेत. 



मैदानावर विराट आणि मैदानाबाहेर ही विराटच... त्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चाललेय. बेदरकारी ही विराटची खास दिल्ली स्टाईल खासियत आहे. यामुळं तो युथ आयकॉ़न बनलाय. फोटो असो वा व्हिडिओ... विराटची पोस्ट पडली की लाखोंच्या कमेन्ट्सची बरसात होते. 



विराट आता 'फॅमिली मॅन' आहे. अनुष्कासोबत त्याचं करिअरही उंचच उंच जातंय. गेली १६ वर्षे तो क्रिकेट खेळतोय. रोजच नव्या विक्रमाच्या दिशेनं तो वाटचाल करतोय. या भन्नाट एनर्जेटिक क्रिकेट आयकॉ़नला 'झी २४ तास'च्या शुभेच्छा... हॅपी बर्थ डे किंग विराट...