IND vs BAN: भारत आणि बांगलादेशमध्ये (India vs Bangladesh) सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामना आता रंगदार स्थितीत पोहोचला आहे. भारताने पहिल्या डावात 404 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र भारताच्या आव्हनाचा पाठलाग करताना बांग्लादेशने कुलदीप यादवसमोर (Kuldeep Yadav) शरणागती पत्करली. यादवच्या 5 विकेट्स आणि मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) 3 विकेट्समुळे बांगलादेश फक्त 150 धावा करू शकला. त्यामुळे भारताकडे 258 धावांची आघाडी होती. (Virat Kohli Celebration Of Cheteshwar Pujara Century in India vs Bangladesh 1st test marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी बांग्लादेशच्या गोलंदाजांचा घाम काढला. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि शुभमन गिल (Shubman Gill) या दोघांच्या शतकी खेळीने मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारली. चेतेश्वर पुजाराने त्याच्या करियरमधील सर्वात वादळी खेळी (Cheteshwar Pujara fastest Century) केली. पुजाराने 130 चेंडूत 102 धावा केल्या आहेत. पुजाराने त्याचं 18 वं शतक झळकावलं आहे. त्याच्या कारकीर्दीतील पुजाराचं हे सर्वात वेगवान शतक ठरलं. पुजाराने जरी शतक केलं असलं तरी चर्चा आहे विराट कोहलीची...


आणखी वाचा - Arjun Tendulkar Century: "माझा मुलगा असल्याने अर्जुनवर...", मॅचच्या आधी सचिनने दिला होता हा सल्ला


टीम इंडियाने डाव घोषित केल्यावर विराट कोहली (Virat Kohli) नाबाद 19 आणि चेतेश्वर पुजारा नाबाद 102 (Cheteshwar Pujara) होते. चेतेश्वर पुजाराने शतक केलं, त्यावेळी विराट कोहली मैदानात होता. विराटचा स्वभाग सर्वांना माहिती आहे. सर्वांच्या आनंदात सामील होणारा विराट, पुजाराचं शतकी सेलिब्रेशन चुकवेल, असं होईल का?


पाहा Video -



दरम्यान, पुजाराने शतक केलं, त्यावेळी विराटने (Virat Kohli Celebration) नेहमी प्रमाणे हात उंचावत पुजाराच्या शतकाचा आनंदोस्तव साजरा केला. दुसऱ्या डावामध्ये भारताने 258 वर डाव घोषित केला. आता बांग्लादेशपुढे 512 धावांचं आव्हान आहे. त्यामुळे आता बांग्लादेशचे फलंदाज कशी कामगिरी करणार यावर सर्वांचं लक्ष लागलंय.