मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार बॅटसमन विराट कोहलीला (Virat Kohli) आशिया कपमध्ये फॉर्म गवसला आहे. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) त्याच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. दरम्यान ही अपेक्षा व्यक्त होत असतानाच आता विराटला दोन मोठे रेकॉर्ड खुणावतायत. हे रेकॉर्ड नेमके कोणते आहेत ? व विराट हे रेकॉर्ड टी20 वर्ल्डकपपुर्वी (T20 World Cup) मोडतो का? याकडेच क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्डकपपुर्वी (T20 World Cup)  टीम इंडियाला मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेत विराट कोहलीला दोन मोठे रेकॉर्ड करण्याची संधी आहे. या रेकॉर्डमध्ये त्याला प्रशिक्षक राहूल द्रविडचा (Rahul Dravid) विक्रम मोडण्याची संधी आहे. नेमके हे रेकॉर्ड कोणते आहेत ते जाणून घेऊयात. 


 


"सर्वात ताकदवान टीमही सचिनसोबत....."खेळाडूने अखेर मैदानावरचा 'तो' किस्सा सांगितलाच 


 


T20त 11 हजार धावा
विराट कोहली (Virat Kohli) T20 क्रिकेटमध्ये 11000 धावांच्या आकड्यापासून फक्त 98 रन्सने दूर आहे. आगामी मालिकेत त्याला हे  रन्स काढण्याची नामी संधी आहे. जर हे रन्स त्याने काढल्यास अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरणार आहे. कोहलीच्या नावावर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 40.37 च्या सरासरीने 10902 रन्स आहेत. 


कोहलीने (Virat Kohli) टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 349 सामने खेळले आहेत, ज्या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 132.95 आहे. दुसरीकडे रोहित शर्मा (Rohit sharma) या फॉरमॅटमध्ये 10470 धावांसह भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.


विराट चौथ्या स्थानी
विराट कोहलीच्या (Virat Kohli)  आधी सर्वाधिक धावांमध्ये अनेक दिग्गज बॅटसमनची नावे आहेत. ख्रिस गेल (14562), शोएब मलिक (11893) आणि किरॉन पोलार्ड (11829) यांच्या मागे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत चौथ्या स्थानी विराट कोहली आहे. विराट कोहलीने 10902 धावा केल्या आहेत. याच क्रमवारीत रोहीत शर्मा सातव्या स्थानी आहे.    


द्रविडचा विक्रम मोडणार 
विराट कोहली (Virat Kohli)  24,002 धावांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 7व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेत कोहलीने 207 रन्स केल्या तर तो राहुल द्रविडचा विक्रम मोडून सहाव्या क्रमांकावर पोहोचेल.द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 509 सामन्यांमध्ये 24208 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे सचिन तेंडुलकर 34357 धावांसह अव्वल स्थानावर आहे.


दरम्यान टी20 वर्ल्डकपपुर्वी विराटसाठी (Virat Kohli)  हे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे आता हे पाहावे लागणार आहे की, विराट टी20 वर्ल्डकपपुर्वी हे आव्हान पुर्ण करतो की वर्ल्डकपमध्येच (T20 World Cup) हा रेकॉर्ड ब्रेक करतो. याकडे आता क्रिकेटफॅन्सचे लक्ष लागले आहे.