पर्थ : टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) आजपासून सुरूवात झाली आहे. टीम इंडियासह (Team India) इतर प्रतिस्पर्धी संघाच लक्ष या वर्ल्ड कपवर नाव कोरण्यावर असणार आहे. त्यात आता टीम इंडियासाठी सर्वांत दिलासादायक बाब म्हणजे विराट फॉर्ममध्ये परतलाय. विराटचा (virat kohli) हा फॉर्म टी20 वर्ल्ड कपपर्यंत कायम राहीला, तर टीम इंडियाला वर्ल्ड कपवर नाव कोरण्यास कोणीही रोखू शकत नाही. मात्र जर वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची बॅट तळपलीच नाही, तर विराटची टीम मधली नंबर 3ची जागा धोक्यात येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कप 2022 (Asia Cup) वर जरी टीम इंडिया (Team India) नाव कोरू शकली नसली तरी, या स्पर्धेत विराट फॉर्ममध्ये परतल्याचा अनेकांना सुखद आनंद आहे. त्यामुळे हा त्याचा फ़ॉर्म आता कायम राहावा,अशीच अपेक्षा क्रिकेट फॅन्स करतायत. त्यामुळे विराटने (virat kohli) हा फॉर्म कायम ठेवून वर्ल्ड कप गाजवावा अशी क्रिकेट फॅन्सची इच्छा आहे. आणि हेच विराटला अपेक्षित असणार आहे. 


बॅट तळपलीच नाही तर...


विराट (virat kohli) जरी फॉर्ममध्ये परतला असला तरी, जर वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) त्याची बॅटच चालली नाही. तर त्याच्यासाठी ही मोठी धोक्याची घंटा असू शकते. कारण असे अनेक युवा खेळाडू आहेत, जे त्याच्या 3 नंबरच्या पोझिशनवर य़ेऊन उत्कृष्ट बॅटींग करू शकतात. त्यामुळे त्याच टीम इंडियातलं स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे. 


'हे' खेळाडू ठरू शकतात विराटला पर्याय 


टीम इंडियात (Team India) असे अनेक खेळाडू आहेत. जे चांगली कामगिरी करत आहेत. योग्य पद्धतीने खेळण्याची संधी दिल्यास ते  आणखी आश्चर्यकारक कामगिरी करू शकतात. तसेच ते विराटला पर्याय देखील ठरू शकतात. यामध्ये सर्वप्रथम जे नाव येते, ते म्हणजे सुर्यकूमार यादव (Surykumar Yadav). यादव सध्या खुपच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यावर्षी टी20त सर्वाधिक धावा करण्यात देखील तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विराटची 3 नंबरची जागा धोक्यात येण्यास तो मोठा पर्याय आहे.  


दुसरा खेळाडू म्हटलं तर तो दीपक हुड्डा (Deepak Hooda) झाला. दीपक हूड्डा सुद्धा नंबर तीनवर येऊन उत्कृष्ट बॅटींग करू शकतो. सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. जेव्हा जेव्हा त्याला संघात संधी मिळते, तेव्हा तेव्हा तो स्वत:ची दावेदारी पक्की करत असतो. त्यामुळे तो देखील विराटला पर्याय ठरू शकतो.
 
दरम्यान हे सर्व अंदाज आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) विराट कशी कामगिरी करतो,यावर सर्व निर्भर असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आणि विराट कोहली (virat kohli) वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.