Virat Kohli crying after reached in playoffs : गेल्या 17 वर्षांपासून चाहत्यांचं आमच्यावरचं प्रेम कधी विसरू शकत नाही. आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही येत्या काळात फॅन्ससाठी चांगली कामगिरी करू, असं वक्तव्य विराट कोहलीने सलग 6 व्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर केलं होतं. विराट अँड कंपनी निश्चय केला अन् आज सलग 6 सामन्यात विजय मिळवत प्लेऑफचं तिकिट निश्चित केलंय. आरसीबीने चाहत्यांसाठी विजयाची गाडी पकडली अन् आता थेट प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. अशातच रोमांचक सामन्यात विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकांत 7 गडी गमावून 191 धावाच करता आल्या. यासह फाफ डुप्लेसिसचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा या मोसमातील चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद पात्र ठरले होते. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोण्यासाठी 17 धावांची गरज होती. धोनीने सिक्स मारला अन् सामना चेन्नईच्या बाजूने झुकवला. मात्र, यश दयालने पुढच्याच बॉलवर धोनीची विकेट काढली अन् सामना पुन्हा आरसीबीच्या खिशात आणून ठेवला. अखेरच्या बॉलवर आरसीबीने विजय पक्का केला. सामना जिंकल्यानंतर विराट कोहली अन् फाफ डु प्लेसिसला आनंद अनावर झाला. विराटच्या डोळ्यात पाणी आल्याचं देखील दिसून आलं. तर अनुष्काला देखील आनंद आवरता आला नाही.



रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.


चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.