मोहाली : श्रीलंकेला टी-20 सिरीजमध्ये क्लिन स्विप दिल्यानंतर टेस्ट सिरीजचाही पहिला सामना जिंकला आहे. हा सामना माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास होता. कारण त्याचा हा 100 वा सामना होता. शिवाय तो बऱ्याच वर्षांनी टीममधील एक खेळाडू म्हणून मैदानावर उतरला होता. यावेळी पुन्हा एकदा विराट कोहली आणि क्राऊड यांच्यामध्ये मजेशीर कॉम्बिनेशन पहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली नेहमी क्राऊडला मॅचमध्ये समील करून घेण्याच्या प्रयत्नात असतो. कधी टाळ्या तर फॅन्सच्या घोषणांनाही प्रतिसाद देतो. असाच एक प्रत्यय श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये आला. यावेळी विराटने क्राऊडकडून गोलंदाजांचा जोश वाढवला. तसंच तो मैदानावर डान्स करताना कॅमेरात कैद झालाय.


मोहालीच्या स्टेडियममध्ये फॅन्सने '10 रुपये की पेप्सी, कोहली भाई सेक्सी' असे नारे लावले होते. या घोषणा देत असताना विराटने फॅन्सकडे पाहता नोटा उडवण्याची एक्शन केली. त्याचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.



बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात नव्हता. पण विराट कोहलीच्या 100व्या टेस्टच्या निमित्ताने बीसीसीआयने 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली होती. प्रेक्षकांमुळे खेळायला वेगळा जोश मिळतो असं विराटचं म्हणणं आहे. असंच दृश्य मोहालीत पाहायला मिळालंय.


दरम्यान मोहाली टेस्टच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या दुसऱ्या इनिंगमध्ये कोहलीने पुष्पाची स्टाईल करून दाखवली. 51व्या ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाने लसिथ एंबुलदेनियाची विकेट घेतली. जडेजाची ही या टेस्टमधली नववी विकेट होती. मैदानात कोहलीने 'पुष्पा' सिनेमातील 'मैं झुकेगा नहीं' ची स्टेप करत जडेजाची मज्जा घेतली.