Virat Kohli चं चाललंय काय? LIVE सामन्यात शुभमन गिलसोबत असं काही केलं की...पाहा Video
Virat Kohli Viral Video: विराटने गिलसोबत (shubman gill) असं काही कृत्य केलं की सर्वांना हसू आवरता आलं नाही. विराटचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाल्याचं दिसून येतंय.
Virat Kohli, Shubman Gill: इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC Final 2023) जिंकण्यासाठी आमनेसामने उभे ठाकले आहेत. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात 296 धावा केल्या आहेत. फायनल सामना जिंकण्यासाठी 444 रन्सचं आव्हान देण्यात आलंय. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात फलंदाजी असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याने विराट कोहली (Virat Kohli) सध्या टीकेला सामोरा जातोय.
विराट कोहली आणि शुभमन गिल ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावादरम्यान स्लीपमध्ये फिल्डिंग करत होते. दोघंही यावेळी मस्तीच्या मूडमध्ये होते. विराट कोहली खेळ एन्जॉय करत होता. त्याचवेळी विराटने गिलसोबत असं काही कृत्य केलं की सर्वांना हसू आवरता आलं नाही. विराटचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं दिसून येतंय.
पाहा Video
भारताच्या पहिल्या डावात विराट कोहली केवळ 14 धावा करून बाद झाला तर शुभमन गिललाही केवळ 15 धावा करता आल्या. तर दुसऱ्या डावात शुभमन गिल 18 धावा करत बाद झाला. त्यामुळे आता विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी असेल.
शुभमन गिल आऊट की नॉटआऊट?
शुभमन 18 धावांवर खेळत असताना त्याने स्लिपमध्ये चेंडू मारला. त्यावेळी कॅप्टन कमिन्सने 4 स्लीप मागे लावल्या होत्या. स्लिपमध्ये असलेल्या कॅमरून ग्रीनने (Cameron Green) शुबमनचा झेल पकडला. झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीला लागल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट पाहायला मिळालं. अद्यायावर तंत्रज्ञान असताना देखील थर्ड अंपायरने व्हिडीओ झूम केला नाही आणि शुभमनला आऊट घोषित केलं.
शुभमन गिलने व्यक्त केली नाराजी
आऊट दिल्यावर शुभमन गिलने ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेक टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी देखील सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटवला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचा पराभव झाला तर अंपायर्सचा निर्णय कारणीभूत ठरणार का? असा ,सवाल आता नेटकरी सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत.