मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमी आपल्या फलंदाजीच्या रेकॉर्डबद्दल चर्चेत असतो. आतापर्यंत विराट ५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलाय. मात्र विशेष म्हणजे विराटला इतक्या सामन्यांमध्ये एकदाही टी-२० शतक पूर्ण करता आलेले नाहीये. यामागे त्याची खराब फलंदाजी हे कारण नाहीये तर कमी धावांचे लक्ष्य तसेच कमी ओव्हर खेळण्यास मिळाल्याने त्याला शतक झळकावता आलेले नाहीये.


विराट कोहलीच्या टी-२० सामन्यांमधील आतापर्यतच्या मोठ्या खेळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेडमध्ये नाबाद ९० धावा 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेडमधील टी-२० सामन्यात विराट कोहलीने ५५ चेंडुत नाबाद ९० धावा केल्या होत्या आणि भारताने या सामन्यात विजय मिळवला होता. 


वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत नाबाद ८९ धावा 
टी-२० वर्ल्डकप २०१६मध्ये विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध ४७ चेंडूत नाबाद ८९ धावांची खेळी केली होती. भारताने या सामन्यात २० षटकांत १९२ धावा केल्या होत्या. 


ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटच्या ८२ धावा
टी-२० वर्ल्डकप २०१६मधील क्वार्टरफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी १६१ धावांचे आव्हान दिले होते. विराटने या सामन्यात जबरदस्त खेळी करताना ५१ चेंडूत नाबाद ८२ धावा तडकावल्या होतेया.


श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये ८२ धावा
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने ५४ चेंडूत ८२ धावांची खेळी केली होती. जेव्हा विराट बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी १४ धावांची आवश्यकता होती. विराट खेळपट्टीवर टिकून राहिला असता तरी तो या सामन्यात शतक साजरे करु शकला नसता. 


पाकिस्तानविरुद्ध विराटच्या ७८ धावा
पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने ६१ चेंडूत ७८ नाबाद धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतासमोर विजयासाठी मोठे लक्ष्य असते तर कदाचित विराटला शतक करता आले असते.