मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आज ५ नोव्हेंबर ला आपला ३० वा वाढदिवस साजरा करीत आहे. १९८८ मध्ये जन्मलेला विराट हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटर्सपैकी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला निवृती घेताना तुझा रेकॉर्ड कोण तोडू शकेल ? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सचिनने विराट कोहलीचे नाव घेतले होते.  विराटच्या आक्रमक खेळीचा अंदाज आपल्याला प्रत्येक मॅचमधून येत असतो.


दरम्यान, तो आपला फिटनेस राखण्यासाठीही कठोर परिश्रम घेत असतो. नियमित व्यायाम तसेच प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार विराट आहार घेत असतो. अलिकडच्या एका मुलाखतीत विराटने आपल्या संपूर्ण आहार वेळापत्रकाविषयी सांगितले. सकाळच्या ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंत तो काय काय खातो याचा तपशील त्याने सांगितला आहे.


 विराटचा ब्रेकफास्ट


 आमलेट, काळी मिर्ची आणि चिजसोबत पालक
 बऱ्याचदा मासे, मटण, पपई आणि टरबूज फॅट्ससाठी एक्सट्रा चिज
 हॉटेलमध्ये असला तरीही ब्रेड बटर विराट सोबतच ठेवतो.
 लिंबू सोबत ग्रीन टी (३-४ कप)


विराटचा लंच


 ग्रिल्ड चिकन आणि ग्रिल्ड फिश
 उकडलेले बटाटे, पालक आणि भाजी 
 मसल्स वाढण्याससाठी रेड मीट


 विराट चा डिनर


 फक्त सी-फूड