T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कप आता काही क्षणांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी सहभागी संघांचा सरावही शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. भारतीय संघसुद्धा या क्रिकेटच्या महासंग्रामासाठी सज्ज होताना दिसत आहे. 23 ऑक्टोबरला भारतीय संघ पाकिस्तानशी (Ind vs Pakistan) दोन हात करताना दिसणार आहे. ज्यासाठी आतापासूनच फक्त खेळाडूच नव्हे, तर क्रिकेटप्रेमींनीसुद्धा तयारी सुरु केली आहे. आपल्या हक्काच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी असंख्य बेत आखले आहेत. पण, या साऱ्यामध्ये क्रिकेटप्रेमींच्या उत्साहावर विरझण टाकणारी बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथे एक वर्ल्ड कप संपलेला नसतानाच आता दुसऱ्या वर्ल्ड कपच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत. 2024 मध्ये वेस्ट इंडिज (West indies) आणि युएसएमध्ये हा वर्ल्ड कप पार पडणार आहे. पण, यामध्ये भारतीय संघातील काही बडे खेळाडू मात्र दिसणार नाहीत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


यंदाचा टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup ) पार पडल्यानंतर हे खेळाडू या फॉर्ममधूनच माघार घेतील अशी चिन्हं आहेत. खेळाडूंनी माघार घेतली नाही, तर निवड समिती त्यांच्या परीनं संघात काही बदल करेल. या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि दिनेश कार्तिकची नावं पुढे येत आहेत. 


T2O World Cup: वॉर्म अप सामन्याचा ठरला हिरो, नंतर फॅन्सने बनवलं मोहम्मद शमीला विलन, पाहा VIDEO


रोहित शर्मा (Rohit Sharma) गेल्या काही काळापासून दुखापतींचा सामना करत आहे. ज्यामुळं मोक्याच्याच वेळी त्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातही  T20 cricket मध्ये त्याची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. ज्यामुळं 2024 मध्ये तो टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 



विराटची (Virat Kohli) कामगिरी पाहता हा खेळाडू मैदान गाजवणार हे कोणीही निर्विवादपणे म्हणून जातं. पण, ज्या क्रिकेट फॉर्मनं विराटला मोठं केलं, त्या फॉर्ममध्ये तो फारफारतर 2023 पर्यंतच टिकेल असं सांगण्यात येत आहे. काहींनी तर तो टी20 वर्ल्ड कपनंतर लगेचच या प्रकारामधून निवृत्ती घेईल असाही अंदाज वर्तवला आहे. 



अनपेक्षित पुनरागमन करत आपल्या खेळाच्या बळावर दिनेश कार्तिकनंही (Dinesh Karthik) टी20 फॉर्ममध्ये स्वत:ला सिद्ध केलं. पण, वेळ कुणासाठीच थांबत नाही आणि DK सुद्धा याला अपवाद नाही. 37 वर्षांच्या दिनेश कार्तिकविषयी येत्या काळात निवड समितीच कठोर निर्णय घेऊ शकते. त्यामुळं 2007 पासून टी20 फॉर्मममध्ये खेळणारा दिनेश कार्तिक येत्या दिवसात मात्र या फॉर्मला अलविदा करु शकतो. 



थोडक्यात हे तीन महत्त्वाचे खेळाडू पाहता, संघात त्यांच्या नसण्यामुळे मोठा फरक पडणार हे नक्की. त्यामुळं येत्या काळात संघाची धुरा ही नवोदित खेळाडूंच्या खांद्यांवर असणार आहे. आता ते कशी कामगिरी करतात हे वेळच ठरवेल.