T2O World Cup: वॉर्म अप सामन्याचा ठरला हिरो, नंतर फॅन्सने बनवलं मोहम्मद शमीला विलन, पाहा VIDEO

मोहम्मद शमीने शाहीन आफ्रिदीला दिले गोलंदाजीचे धडे, VIDEO पाहून फॅन्स संतापले 

Updated: Oct 17, 2022, 09:20 PM IST
T2O World Cup: वॉर्म अप सामन्याचा ठरला हिरो, नंतर फॅन्सने बनवलं मोहम्मद शमीला विलन, पाहा VIDEO  title=

पर्थ : टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही संघानी आज T20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) चा सराव सामना खेळला. जिथे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 धावांनी विजय मिळवला. तर पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या सामन्यात 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या विजयाच्या शिल्पकार मोहम्मद शमी (Mohammed Shami) ठरला. मात्र हिरो ठरलेल्या शमीला काही तासातच विलन बनवण्यात आलं. नेमकं अस काय झालं की त्याला अचानक विलन बनवण्यात आलं हे जाणून घेऊय़ात.  

हे ही वाचा : 2,2,W,W,W,W…मोहम्मद शमीची एकच ओव्हर, आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव 

असा ठरला विलन?

दोन्ही संघाच्या वॉर्म अप सामन्याआधी आफ्रिदी (shaheem shah afridi) आणि शमी (Mohammed Shami) एकत्र सराव करताना दिसले. दोन्ही खेळाडूंच्या सरावाचा हा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटर हॅडलवरून शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये मोहम्मद शमी पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला गोलंदाजीच्या टिप्स देताना दिसला. या व्हिडिओवर भारत आणि पाकिस्तान (india vs pakistan) या दोन्ही देशांच्या चाहत्यांकडून कमेटं करण्यात आली होती. 

हे ही वाचा : Ind vs Aus : किंग कोहलीची सुपर कॅच, VIDEO आला समोर 

शमीवर फॅन्स नाराज 

शमीने (Mohammed Shami) शाहीन आफ्रिदीला (shaheem shah afridi) गोलंदाजीच्या टिप्स देणे भारतीय चाहत्यांना आवडले नाहीये. त्यामुळे अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट करून नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी शमी आफ्रिदीला मदत करत असल्याने पाकिस्तानी चाहते आनंदी दिसत आहेत. या व्हिडिओच्या कमेंटला एका यूझरने लिहिले की, शमी भाई हे का शिकवत आहेस? असा सवाल केला. तर दुसऱ्या य़ुझरने, इंग्लंडच्या खेळाडूंनी हे चांगले केले, शमी शाहीनला समजावून सांगत होता तेव्हा ते मध्ये आले, असे त्याने कमेंट केले आहे. 

हे ही वाचा : विराट कोहलीसोबत दिसणारी 'ती' मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? जाणून घ्या

दरम्यान टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारत आणि पाकिस्तान (india vs pakistan) 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर भिडणार आहेत. गेल्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.