मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली कायम त्याच्या फिटनेसमुळे आणि शानदार खेळीमुळे चर्चेत असतो. कोहली क्रिकेटच्या तीन फॉर्मेटमध्ये खेळतो. शिवाय तीन फॉर्मेटमध्ये खेळत तो उत्तम कामगिरी देखील बजावतो. त्याच्या या धमाकेदार प्रदर्शनाचं मुख्य कारण म्हणजे त्याची फिटनेस. विराट कोहली कायम फिटनेसवर विश्वास ठेकतो आणि याच विश्वासाच्या जोरावर त्याने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटच्या दैनंदिन जीवनात तो सर्वात जास्त महत्त्व फिटनेसला देतो. क्रिकेट करियरमध्ये तो दोनवेळा फिटनेसमुळे मैदानाबाहेर गेला. जर उत्तम कामगिरी बजावायची असेल तर फिटनेस फार महत्त्वाचं असं खुद्द विराटने सांगितलं  आहे.



विराटनेहमी त्याच्या सोशल मीडियाद्वारे वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. विराट नियमीत जिममध्ये फिट राहण्यासाठी मेहनत  घेत असतो. तर आज आपण जाणून घेऊ विरटच्या आवडते व्यायम प्रकार, जे तो रोज करतो. 


बातमी - डेब्यू सामन्यात ईशान किशनचं तुफानी अर्धशतक  https://zeenews.india.com/marathi/sports/ishan-kishan-hit-the-record-of-indian-team/557045


 


विराट कोहली फिट राहण्यासाठी जे शक्य आहे ते करतो. तो रोज एका हाताने पुश अप्स करतो. व्हिग्रिप पूल, डंबल चेस्ट प्रेस, क्रंच एक्सरसाईज, धावनं शिवाय न थकता पॉवर स्नॅच सुद्धा करतो. या सर्व प्रकारचे व्यायम तो करत असल्यामुळे तो फिट आहे. 



विराट म्हणतो की,  'काही एक्सरसाईज मी रोज करतो. 'एक्सरसाईज करण्यासाठी खूप मेहनत लागते. पण दररोज पॉवर स्नॅच आणि डेडलिफ्ट करायला मला फार आवडतं. या एक्सरसाईजमुळे कॅलेरी बर्न होते. ज्यामुळे तुमचं शरीर संतुलित राहण्यास मदत होते.' असं तो म्हणाला.