विराट कोहलीचा ट्विटरवर `टोमणा षटकार`, म्हणतो, यालाच म्हणतात ``मैत्री``
क्रिकेटशी संबंध नसलेल्या `या` दोन खेळाडूंविषयी कोहलीच्या मनात इतका सन्मान का आहे?ट्विटरवर इतका इमोशनल का झाला विराट?
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन टी20 मालिकेतील दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने (Team India) रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) आणि फिनिशर दिनेश कार्तिक (Dinesh kartik) ठरला होता. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. टीम इंडियाच्या दुसऱ्या टी20 सामन्यातील विजयानंतर माजी कर्णधार विराट कोहलीचं एक ट्विट खुपचं व्हायरल होत आहे. हे ट्विट व्हायरल होण्यामागचं कारण काय आहे, ते जाणून घेऊयात.
विराट कोहलीने (Virat kohli) आज दुपारी एक इमोशनल ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने दोन खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करत त्याने या दोन खेळाडूंचा सन्मान करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे फोटोतल्या या दोनही व्यक्तींचा क्रिकेटशी काहीएक संबंध नाही आहे. त्यामुळे नेमके हे दोन खेळाडू कोण आहे? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
ट्विटमध्ये काय म्हणालाय?
विराट कोहलीने (Virat kohli) टेनिसपट्टू राफेल नदाल (Rafel Nadal) आणि रॉजर फेडररचे (Roger Federer) फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोवर कॅप्शन लिहताना विराट म्हणतो, कोणी असा विचार केला होता का,प्रतिस्पर्धी एकमेकांबद्दल असा विचार करत असतील. हेच खेळाचे सौदर्य आहे. पुढे विराट म्हणाला की, जेव्हा तुमचे साथीदार तुमच्यासाठी रडतात, तेव्हा तुम्हाला कळते की ही देवाने दिलेली प्रतिभा तुम्हाला का दिली गेली आहे, असे तो म्हणाला आहे.
विराटने (Virat kohli) ट्विट केलेल्या फोटोत राफेल नदाल आणि रॉजर फेडरर रडताना दिसत आहे. या फोटोवर ट्विटच्या शेवटी विराट म्हणतो, या दोघांचा सन्मान करण्याशिवाय काहीच नाही आहे. हा माझ्या आयुष्यातला सर्वांत सुंदर फोटो असल्याचे तो येथे नमुद करतोय.
कारकिर्दीतला शेवटचा सामना
दरम्यान रॉजर फेडररने (Roger Federer) शुक्रवारी कारकिर्दीतला शेवटचा सामना खेळला होता. या निरोपाच्या सामन्यानंतर त्याचे प्रतिस्पर्धी खेळाडू व मित्र खुपच इमोशनल झाले आहे. या संदर्भातलाच राफेल नदालचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत फेडररच्या निरोप समारंभात राफेल नदाल त्याला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देताना दिसत आहे. दोघांची टेनिस कोर्टवरील खुप चांगली मैत्री आहे. मात्र आता हा मित्र कोर्टवर पुन्हा खेळणार नसल्याने राफेल नदाल खुपच इमोशनल झाला होता.
रॉजर फेडररने (Roger Federer) कारकिर्दीतला शेवटचा सामना अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक यांच्याशी झाला. ज्यामध्ये त्यांचा 4-6, 7-6(2), 11-9 असा पराभव झाला. सामना संपल्यानंतर फेडररला भावनिक निरोप देण्यात आला होता. ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.