RCB vs PBKS : `रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...`, उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा Video
Virat Kohli Enter in Kagiso Rabada podcast : कगिसो रबाडा याच्यासोबत सुरू असलेल्या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहली एन्ट्री करतो, तेव्हा काय होतं पाहा..!
Panjab Kings vs Royal Challengers Bengaluru : आयपीएलचा 58 वा सामना पंजाब किंग्स (Panjab Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) यांच्यात खेळवला जाणार आहे. धर्मशालाच्या (Dharamsala) मैदानावर हा सामना खेळवला जाईल. हा सामना दोन्ही संघासाठी करो या मरो असाच असणार आहे. जो संघ सामन्यात पराभूत होईल, तो संघ थेट आयपीएलमधून बाहेर पडणार आहे. सामना जरी अटीतटीचा असला तरी खेळाडू मात्र मजा मस्ती करताना दिसत आहेत. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झालाय. यामध्ये कगिसो रबाडाच्या पॉडकास्टमध्ये (Kagiso Rabada podcast) थेट विराट कोहलीची (Virat Kohli) एन्ट्री झाली.
आगामी टी-20 वर्ल्ड कपपूर्वी अनेक खेळाडू मुलाखती देत आहेत. अशातच एका पॉडकास्टमध्ये पंजाब किंग्जचा स्टार गोलंदाज कगिसो रबाडा मुलाखत देत होता. हा पॉडकास्ट सुरू असताना विराट कोहली थेट पंजाबच्या ड्रेसिंग रुममध्ये शिरला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी विराटने तिथं धमाल केली. रबाडा बोलत असताना विराट तिथं आला, विराटला पाहून रबाडाला धक्काच बसला. विराट इथं नाचतोय, असं रबाडा पॉडकास्टमध्ये म्हणताना दिसतो. त्यावेळी रबाडा सांगतो, मी सध्या पॉडकास्टमध्ये आहे.
कोणासोबत पॉडकास्टमध्ये आहे? असा सवाल विराटने घेतल्यावर, मी विलो टॉकशी बोलतोय, असं रबाडाने म्हटलं आहे. त्यावेळी रबाडाने विराटला ऑन कॅमेरा येण्यास विचारलं. तेव्हा विराट देखील कॅमेऱ्यासमोर आला अन् हॅलो ऑस्ट्रेलियन असं म्हणत अभिवादन केलं. त्यावेळी विराटला पॉडकास्ट ऐकू येत नव्हता. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे.
पाहा Video
करो या मरो...
दरम्यान, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (PBKS vs RCB) यांचे प्रत्येकी 8 गुण झाले आहेत. दोन्ही संघांनी 11 पैकी प्रत्येकी 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता त्यांना प्लेऑफसाठी धडपड करावी लागत आहे. आजच्या सामन्यात जो संघ पराभूत होईल, तो संघ थेट आयपीएलमधून बाहेर जाणार आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर होणारी पहिली टीम ठरली आहे. आता दुसरी टीम कोण ठरणार? आरसीबी की पंजाब? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.