सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं १५३ रन्सची झुंजार खेळी केली. विराटच्या या शतकामुळे भारताचा डाव ३०७ रन्सवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेला २८ रन्सची आघाडी मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅचवेळी विराट कोहलीनं जेव्हा १५० रन्स पूर्ण केल्या तेव्हा त्यानं गळ्यातली चेन बाहेर काढली आणि तिचं चुंबन घेतलं. विराट कोहलीच्या गळ्यातल्या चेनमध्ये अनुष्का शर्मानं त्याला लग्नात दिलेली अंगठी आहे. या अंगठीचंच चुंबन घेऊन विराटनं अनुष्काबद्दलचं त्याचं प्रेम व्यक्त केलं.


सेंच्युरिअनच्या मैदानात केलेल्या या दीडशतकाबरोबरच विराटनं काही रेकॉर्ड्सही त्याच्या नावावर केले. विराटनं २१७ बॉल्समध्ये केलेल्या या खेळीमध्ये १५ फोरचा समावेश होता. विराटच्या दीडशतकामुळेच भारतानं या मॅचमध्ये कमबॅक केलं.


विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे २१वं शतक होतं. कोहलीनं त्याचं शतक १४६ बॉल्समध्ये १० फोरच्या मदतीनं पूर्ण केलं. सेंच्युरिअनच्या मैदानात शतक लगावणारा विराट कोहली पहिला परदेशी कॅप्टन बनला आहे. याआधी या मैदानात परदेशी कॅप्टनचा सर्वाधिक स्कोअर धोनीच्या नावावर होता. धोनीनं २०१० साली या मैदानात ९० रन्स केले होते.


विराट कोहली दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात शतक झळकावणारा दुसरा भारतीय कॅप्टन बनला आहे. याआधी सचिन तेंडुलकरनं १९९७मध्ये केप टाऊन टेस्टमध्ये शतक लगावलं होतं. त्या मॅचमध्ये सचिननं १६९ रन्सची खेळी केली होती.


दक्षिण आफ्रिकेमध्ये विराटचं हे दुसरं टेस्ट शतक आहे. कोहलीनं याआधी २०१३मध्ये दक्षिण आफ्रिकेत शतक केलं होतं. सचिननं दक्षिण आफ्रिकेमध्ये ५ टेस्ट शतकं लगावली आहेत. सचिननं १९९२मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिलं शतक केलं. त्यानंतर १९९७, २००१, २०१० आणि २०११मध्ये सचिननं दक्षिण आफ्रिकेत शतकं केली.


याचबरोबर विराटनं एकच नाही तर दोन महत्त्वाची रेकॉर्ड स्वत:च्या नावार करून सचिन तेंडुलकरच्या आणखी जवळ यायला सुरुवात केली.


सेंच्युरिअनमध्ये लगावलेल्या शतकाबरोबरच विराट दक्षिण आफ्रिकेत दोन पेक्षा जास्त शतकं लगावणरा दुसरा भारतीय बॅट्समन बनला आहे. सचिनच्या नावावर दक्षिण आफ्रिकेमध्ये ५ शतकं आहेत.


विराट कोहलीला त्याचं २१वं शतक पूर्ण करायला सचिनपेक्षा एक इनिंग कमी लागली. विराटनं १०९ इनिंगमध्ये २१ शतकं पूर्ण केली. स्टीव्ह स्मिथनं हेच रेकॉर्ड १०५ इनिंगमध्ये केलं आहे. २१ वं टेस्ट शतक लगावण्यासाठी ब्रॅडमनना ५६, गावसकरना ९८ आणि सचिनला ११० इनिंग लागल्या होत्या.


विराट कोहलीला दुसऱ्या बाजूनं फारशी मदत मिळाली नाही. हार्दिक पांड्या रन आऊट झाला. त्यानंतर आर. अश्विननं ५४ बॉल्समध्ये ३८ रन्स केल्या. कोहली-अश्विननी ६२ बॉल्समध्ये ५० रन्स केल्या.


विराट कोहलीनं आत्तापर्यंत ३३ टेस्ट मॅचमध्ये कॅप्टन्सी केली आहे. यातल्या २० मॅचमध्ये भारताचा विजय तर ९ मॅचमध्ये पराभव झालाय. ९ मॅच ड्रॉ झाल्यात.