विराटसाठी कायपण! `जबरा फॅन`ने चीभेने रेखाटले कोहलीचे पोट्रेट
Virat Kohli Portrait: विराट कोहली मैदानावर आल्यावर स्टेडियममधील प्रेक्षकांमधून फक्त कोहली कोहली असा आवाज येत असतो.विराट कोहलीची फॅन फॉलोइंग सुपरस्टारसारखी आहे. विराटची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले. आता एका कलाकाराने त्यांच्याबद्दल जोश दाखवला आहे.
Virat Kohli Portrait: क्रिकेटचे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूसाठी काहीही करायला तयार असतात. कोणी अंगावर टॅटू काढतो तर कोणी सर्व मॅच पाहायला स्टेडियममध्ये उपस्थित असतो. असाच एक विराट कोहलीचा जबरा फॅन समोर आलाय त्याने आपल्या जीभेने विराट कोहलीचे पोट्रेट काढले आहे. विराट कोहलीची गणना केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. विराट कोहली मैदानावर आल्यावर स्टेडियममधील प्रेक्षकांमधून फक्त कोहली कोहली असा आवाज येत असतो.विराट कोहलीची फॅन फॉलोइंग सुपरस्टारसारखी आहे. विराटची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले. आता एका कलाकाराने त्यांच्याबद्दल जोश दाखवला आहे.
विराट कोहली सध्या आशिया कप खेळण्यासाठी टीम इंडियासोबत श्रीलंकेत आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कप-2023 चे जेतेपद पटकावण्याच्या इराद्याने खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे. आशिया कपमधून विराटच्या चाहत्यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. याच स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या गट सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही.
जीभेने काढले पोट्रेट
सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणार्या खेळाडूंपैकी एक असलेल्या विराटबद्दल एका कलाकाराने अनोख्या शैलीत आपले प्रेम व्यक्त केले आहे.
या कलाकाराने आपल्या जिभेने विराट कोहलीचे पोट्रेट काढले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये कलाकाराची मेहनत आणि समर्पण दिसत आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर काहीजण त्याची वाहवा करत आहेत. तर काहीजण या कलाकाराची खिल्लीदेखील उडवत आहेत.
पाकविरुद्ध शतक ठोकणार?
दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत चाहत्यांना विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. विराटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 76 शतके ठोकली आहेत. सर्वोच्च स्थानावर महान सचिन तेंडुलकर आहे. तेंडुलकरने 100 आंतरराष्ट्रीय शतकांचा इतिहास रचला आहे. विराटने आणखी एक शतक ठोकल्यास तो सचिनच्या रेकॉर्डच्या जवळ येईल.