इंदूर : भारताने बांगलादेशचा पहिल्या टेस्ट सामन्यात एक इनिंग आणि 130 रनने पराभव केला. २ सामन्यांच्या या सिरीजमध्ये भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. विराट सेनेने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहलीचा एक फॅन्स सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवा देऊन मैदानात घुसला. लोखंडी बॅरिगेट्स ओलांडून तो थेट विराटकडे पोहोचला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रिंक्स ब्रेकदरम्यान एक फॅन कोहली जवळ धावत गेला. त्याने आपल्या शरीरावर VK पेंट केलं होतं. विराट कोहलीचे पाय पडण्यासाठी तो मैदानात पोहोचला. यादरम्यान सुरक्षा रक्षक त्या व्यक्तीला पकडण्यासाठी पोहोचले असताना कोहलीने त्यांना रोखलं. त्याने आपल्या या फॅनच्या गळ्यात हात टाकला आणि सुरक्षा रक्षकांना त्याला व्यवस्थित बाहेर घेऊन जाण्यास सांगितले.



मयंक अग्रवालच्या दुहेरी शतकच्या जोरावर भारताने बांगलादेशला पराभूत केलं. मयंक अग्रवाल या सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' ठरला. टेस्ट रँकींगमध्ये भारतीय टीम 300 अंकासह पहिल्या स्थानावर कायम आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर 22 नोव्हेंबरला दूसरा आणि शेवटचा टेस्ट सामना होणार आहे. ही टेस्ट मॅच डे-नाइट फॉर्मेटमध्ये असणार आहे. हा ऐतिहासिक सामना दुपारी 1 वाजता सुरु होईल.