बंगळुरू : सुपरस्टार बॅट्समन विराट कोहली आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २ हजार रन्स पूर्ण करणारा कर्णधार बनला आहे. विराटने ऑस्ट्रेलिया विरूद्ध १३ रन्स केल्यावर हा रेकॉर्ड त्याच्या नावावर झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली २१ रन्स करून ऑस्ट्रेलियाच्या नाथन कॉल्टरच्या बॉलवर आऊट झाला. विराटने एक कॅप्टन म्हणूण ३९ वनडे सामन्यांमध्ये २००८ केले आहेत. या सामन्यात तो सर्वाधिक वेगवान २००० रन्स करणारा कर्णधार ठरला आहे. याआधी या यादीत विराटच्याआधी साऊथ आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सचं नाव होतं. त्याने ४१ वनडे सामन्यांमध्ये २००० रन्स पूर्ण केले होते. 


ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कने कर्णधार म्हणूण ४७ खेळींमध्ये वनडे क्रिकेटमध्ये २००० रन्स पूर्ण केले. टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनी याने ४८ खेळींमध्ये आणि इंग्लंडच्या इऑन मोर्गनने ४८ खेळींमध्ये २००० रन्स पूर्ण केले.