मुंबई : न्यूझीलंडच्या विरोधात टी-20 सीरीजमध्ये भारतीय टीमचा दबदबा कायम आहे. त्यातच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये तो जीममध्ये स्टंट करताना दिसत आहे. विराट कोहली वर्कआउट करत आहे. या व्हि़डिओ सोबत त्याने एक कॅप्शन देखील दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिटनेस हा नुसता पर्याय नसला पाहिजे तर त्यामध्ये तुम्ही उत्कृष्ठ देखील असलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये तो एका बॉक्सवरुन दुसऱ्या बॉक्सवर उडी मारताना दिसत आहे. या पोस्टवर अनेकांच्या प्रतिक्रिया ही येत आहे.



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केल्यानंतर विराट कोहलीने भारतीय फलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अनेक सामने त्याने जिंकवून आणले. भारतासाठी त्याने २००८ मध्ये पहिला सामना खेळाला. आज कोहली फिटनेसच्या बाबतीत सर्वात पुढे मानला जातो. तो नेहमी फिटनेसला महत्त्व देतो. इतकंच नाही तर इतर खेळाडूंना ही तो त्याचं महत्त्व दाखवून देतो. आज त्याच्यापासून प्रेरणा घेत अनेक खेळाडूंनी फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं आहे. काही वर्षापूर्वीच त्याने पूर्णपणे शाकाहारी होण्याचा निर्णय ही घेतला होता.


विराट कोहली फिटनेसच्या बाबतीत फार आग्रही असतो. आज म्हणूनच त्याच्या नावावर मोठे रेकॉर्ड पाहायला मिळतात. आज तो जगात पहिल्या स्थानावर आहे.


रन मशीन कोहली खाण्याच्या बाबतीत ही विशेष लक्ष देतो. हिरव्या भाज्यांना तो अधिक महत्त्व देतो. अंडी, मांस आणि दुधाच्या पदार्थापासून तो लांबच आहे. त्य़ाच्या मते यामुळे तो खेळात आणखी चांगलं करु शकला. त्याची पचन शक्ती मजबूत झाली. याआधी वीनस विलियम्स, सेरेना विलियम्स, फुटबॉलर लियोनल मेसी यांनी देखील शाकाहारी होणं पसंद केलं होतं.