R Ashwin Steve smith mankding funny video: नागपूर टेस्ट (Nagpur test) पाठोपाठ भारताने दिल्ली कसोटीतही ऑस्ट्रेलियाचा (IND vs AUS) पराभव केला. यासह भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. नागपूरप्रमाणेच टीम इंडियाने दिल्ली कसोटीही अवघ्या 3 दिवसांत जिंकली. पहिल्या दोन टेस्टमध्ये टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नाचवलं. दुसऱ्या सामन्यात जडेजासमोर (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियन बॅटर्सने नांग्या टाकल्या. तर आश्विनने (R Ashwin) देखील कमाल दाखवली. अशातच आश्विनचा एक व्हिडिओ (Ashwin Viral Video) सध्या व्हायरल होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) जेव्हा जेव्हा गोलंदाजी करत असतो, तेव्हा स्टाईकवर खेळणाऱ्या बॅटरपेक्षा नॉन स्टाईकवर असलेला फलंदाज जास्त सावध असतो. अश्विनचं काही सांगता येत नाही. नॉन स्ट्राईकवर उभ्या असलेल्या फलंदाजाला मंकडिंगने (Mankading) केव्हाही बाद करू शकतो. त्यामुळे कोणीही आश्विनचा दराराच वेगळा... अशातच दुसऱ्या सामन्यात असाच एक प्रसंग पहायला मिळाला.


आणखी वाचा - IND vs AUS: "10 रुपये की पेप्सी, वॉर्नर भाई..." अन् LIVE सामन्यात प्रेक्षकांनी घेतली वॉर्नरची फिरकी, Viral Video


नेमकं काय झालं?


अश्विन ऑस्ट्रेलियाच्या डावातील 15 वी ओव्हर टाकत होता. त्यावेळी मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) फलंदाजी करत होता. त्याने चेंडू टाकण्यापूर्वीच पॅडल स्वीप खेळण्याचं ठरवलं. आश्विनला त्याचा प्लॅन  लक्षात आला. तो बॉल टाकता टाकता थांबला. मात्र, नॉन स्टाईकला असलेला स्मिथ (Steve Smith) काहीसा बिथरला. त्याने लगेच स्वत:ला सेफ केलं.


पाहा Video - 



दरम्यान, आश्विनची (Ashwin Mankading)  ही अॅक्शन बघून स्मिथने घाबरलेल्या अवस्थेत दोन हात वर केले. त्यावर विराट कोहली खळखळून हसला. तर स्टाईकवर असलेला मार्नस लॅबुशेनला देखील हसू आवरलं नाही. त्यानंतर डेड बॉल घोषित केला आणि पुढचा खेळ सुरू झाला. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.