Ind vs Aus Virat Kohli : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये दुसरी टेस्ट मॅच खेळवली जातेय. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) बऱ्याच कालावधीनंतर त्याच्या होम ग्राऊंडवर खेळतोय. त्यामुळे चाहत्यांसाठी हा सामना फार महत्त्वाचा होता. आजच्या सामन्यात कोहली टेस्ट शतकाचा दुष्काळ संपवला. मात्र ज्या पद्धतीने विराट कोहलीला आऊट देण्यात आलं, त्यावरून आता मोठा वाद (Virat Kohli Wicket Controversy) निर्माण झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या नंतर विराट कोहली पव्हेलियनमध्ये जाताना विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. यावेळी डगआऊटमध्ये गेल्यावर त्याने संताप देखील व्यक्त केला. 


Virat Kohli च्या विकेटवरून वाद


दिल्लीतील अरूण जेटली स्टेडीअम सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याच्या आरोप या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याप्रकरणी विराट चांगलाच संतापला आहे. थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दिलेल्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे. टीम इंडियाच्या पहिल्या डावात ही घटना घडली.


टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुहनेमनच्या एका बॉलवर पहिल्या मैदानी अंपयारने एलबीडब्ल्यू आऊट दिलं. यावेळी विराटने (Virat Kohli) रिव्ह्यू घेतला. त्यावेळेस थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth) यांनी त्याला आऊट घोषित केलं. रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दिलेल्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे.



डगआऊटमध्ये येऊन कोच राहुल द्रविड यांच्याशी केली चर्चा


आऊट करार दिल्यानंतर रागाच्या भरात विराट कोहली डग आऊटमध्ये पोहोचला. डग आऊटमध्ये परतल्यानंतर तो थेट कोट राहुल द्रविड यांच्याकडे गेला. यावेळी कोहली कोच राहुल द्रविड यांना, तो आऊट नसल्याचं सांगत असताना दिसतंय. दरम्यान कोहलीला ज्या पद्धतीने आऊट दिलं, ते पाहून राहुल द्रविड देखील नाखूश असल्याचं दिसून आलं. यावेळी विराट कोहली संतापाने बोलत होता. या सर्व प्रकारानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये निघून गेला.