मॅच दरम्यान आपल्या खास मित्राच्या डोक्याचा विराटने केला मसाज
बॉलर्सच्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर टीम इंडियाने शनिवारी टी-२० मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या विजयासोबतच टीम इंडियाने तीन मॅचेसच्या टी-२० सीरिजवर २-१ने कब्जा केला. शेवटची मॅच सुरु असताना एक वेगळाच प्रकार पहायला मिळाला. पाहूयात काय आहे हा प्रकार...
नवी दिल्ली : बॉलर्सच्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर टीम इंडियाने शनिवारी टी-२० मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या विजयासोबतच टीम इंडियाने तीन मॅचेसच्या टी-२० सीरिजवर २-१ने कब्जा केला. शेवटची मॅच सुरु असताना एक वेगळाच प्रकार पहायला मिळाला. पाहूयात काय आहे हा प्रकार...
टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावत १७२ रन्स केले. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकन टीम १६५ रन्सपर्यंतच मजल मारु शकली.
विराटला विश्रांती देण्यात आली मात्र...
केपटाऊनमध्ये खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. कोहली ऐवजी रोहित शर्माने टीमची धूरा सांभाळली. भलेही या मॅचमध्ये विराट कोहली खेळला नाही मात्र, पेवेलियनमध्ये विराट आपल्या पूर्ण एनर्जीत पहायला मिळाला.
कॅमेऱ्यात कैद झाली घटना
मॅच सुरु असताना विराट कोहली आणि शिखर धवन यांची एक सुंदर मुव्हमेंट कॅमेऱ्यात कैद झाली. मॅचच्या १९.४ ओव्हरमध्ये विराट कोहली आपला खास मित्र आणि टीम इंडियाचा सदस्य शिखर धवन याच्या डोक्याची मसाज करताना पहायला मिळाला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
कॅमेरा ड्रेसिंग रुमकडे वळला आणि...
१९.४ ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकच्या रुपात टीम इंडियाचा सातवा विकेट गेला. याच दरम्यान कॅमेरा भारतीय ड्रेसिंग रुमकडे वळला आणि विराट कोहली हा शिखर धवनच्या डोक्याला मसाज करताना दिसला.
सोशल मीडियावर काही चाहत्यांनी विराट आणि शिखरच्या या मुव्हमेंटवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच याचे फोटोज आणि व्हिडिओही शेअर होत आहेत.