मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) आज त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडपासून क्रिकेटजगत आणि फॅन्सकडून त्याच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सर्वात एक गोष्ट विराट कोहलीच्या (Virat Kohli Birthday) अनेक फॅन्सना माहिती नाही आहे. ही गोष्ट म्हणजे विराटच्या ट्विटरवर गोट ऑयकॉन का दिला जातो? हे जाणून घेऊयात. 


म्हणून गोट आयकॉन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने (virat kohli) क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एक वेगळाच दबदबा निर्माण केला आहे. ज्यामध्ये 2 वर्षांहून अधिक काळ त्याच्या बॅटमधून एकही शतक आले नाही. मात्र असे असूनही त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये अजिबात घट झाली नाही. म्हणूनच 23 फेब्रुवारी रोजी ट्विटरने विराट कोहलीच्या (Virat Kohli Birthday) नावापुढे गोट आयकॉन दिले होते. गोट चिन्हाचा अर्थ (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स) सर्व काळातील सर्वोत्तम मानला जातो. म्हणूनच नेहमीच विराट ट्रेडवर असतो तेव्हा  #ViratKohli ट्विटरवरही खूप वेगाने ट्रेंड होताना दिसत आहे. 


GOAT आयकॉन आणखी कोणत्या खेळाडूंना मिळालाय? 


गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स. हे आयकॉन त्यांच्या क्षेत्रातील असामान्य प्रतिभा दर्शवणाऱ्या व्यक्तींसाठी वापरले जाते. विराटसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी यांसारख्या क्रीडा व्यक्तिमत्त्वांकडेही गोट आयकॉन आहे.फक्त भारतीय क्रिकेटरच नाही तर राफेल नदालसारखे टेनिस स्टारही GOAT आयकॉनचा भाग आहेत.गोट आयकॉन मिळवणारे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी सारखे फुटबॉलपट्टू देखील आहेत.


दरम्यान विराट कोहली (Virat Kohli Birthday) सध्या टी20 वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट खेळी करत आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World cup) टीम इंडियाला सेमी फायनलपर्यंत पोहोचवण्यात त्याचा वाटा मोलाचा आहे. आता टीम इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकावा अशी आशा क्रिकेट फॅन्स करत आहे.