एका वर्षात कोहली दुसऱ्यांदा शून्यावर बाद
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. नॅथन कॉल्टरच्या चेंडूवर कोहली शून्यावर बाद झाला.
चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. नॅथन कॉल्टरच्या चेंडूवर कोहली शून्यावर बाद झाला.
यंदाच्या वर्षात शून्यावर बाद होण्याची कोहलीची ही दुसरी वेळ आहे. या वर्षात १९ डावांमध्ये कोहली दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला.
याआधी २०१५ आणि २०१६मध्ये कोहली एकदाही शून्यावर बाद झाला नव्हता. या दोन वर्षात तो ३० इनिंग्स खेळला होता.