फेसबुकवरही विराट कोहली अव्वल
भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक फेसबुक फॉलोअर्सच्या यादीत सलमान खानसह सचिन तेंडुलकर, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रासारख्या प्रसिद्ध सेलिब्रेटींना मागे टाकत अव्वल स्थान मिळवलेय.
मुंबई : भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक फेसबुक फॉलोअर्सच्या यादीत सलमान खानसह सचिन तेंडुलकर, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रासारख्या प्रसिद्ध सेलिब्रेटींना मागे टाकत अव्वल स्थान मिळवलेय.
फेसबुकवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या ३५,७२५, ७१९ इतकी झालीये. याआधी या यादीत दबंग खान सलमानचा नंबर होता. मात्र विराटने त्यालाही मागे टाकलेय. या यादीत सलमान दुसऱ्या स्थानावर तर दीपीका आणि प्रियंका अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.
क्रिकेटचा देव मानला जाणार सचिन तेंडुलकर या यादीत ६व्या स्थानी आहे. काही दिवसांपूर्वीच आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये विराटने अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर आता फॉलोअर्सच्या यादीतही त्याने पहिले स्थान मिळवलेय.