मुंबई : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सुरू आहे. कसोटीमध्ये पराभव मिळवल्यानंतर आता वन डे सीरिज सुरू आहे. आज दुसरा वन डे सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने दोन गडी गमावले आहेत. विराट कोहली पुन्हा आऊट ऑफ फॉर्म पाहायला मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली शून्यवर आऊट झाला आहे. विराटकडून या सामन्यात अपेक्षा होत्या मात्र पुन्हा एकदा अपेक्षा भंग झाला आहे. विराट कोहली यापूर्वी 2019 मध्ये पहिल्यांदा शून्यवर आऊट झाला होता. आता पुन्हा एकदा विराट कोहली भोपळा न फोडताा तंबुत परतला आहे. 


आफ्रिका विरुद्धच्या दुसऱ्या निर्णायक वनडेमध्ये विराट शून्यावर ढेर झाला आहे. तिन्ही फॉरम‍ॅटचं कर्णधारपद सोडल्यानंतर कोहली आपल्या फलंदाजीकडे लक्ष केंद्रीत करत आहे. मात्र पुन्हा एकदा वन डेमध्ये त्याच्या हाती अपयश आलं आहे. 


पहिल्या वन डे सामन्यात कोहलीनं अर्धशतक केलं होतं. मात्र दुसऱ्या वन डेमध्ये शून्यवर आऊट होण्याची वेळ आली. केवळ 5 बॉल खेळून विराट तंबुत परतला आहे. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन- 
शिखर धवन, के एल राहुल (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर) श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल 


दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन -
क्विंटन डी कॉक, जे. मालन, एडन मार्कराम, आर. व्ही. डुसेन, टेंबा बावुमा (कर्णधार), डेव्हिड मिलर, ए. फेलियुक्वाओ, मार्को जेन्सन, केशव महाराज, टी. शम्सी, लुंगी एनगिडी.