`तुझी बायको....`, विराट कोहलीचे शब्द ऐकताच दिनेश कार्तिकने दिलं उत्तर; म्हणाला `माझ्या डोक्यात नव्हतं, पण तू...`
IPL 2024: बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघ मैदानात अत्यंत तणावात असला तरी मैदानाबाहेर मात्र खेळाडू मनमोकळेपणाने आनंद लुटताना दिसत आहेत. नुकतंच एका प्रश्नोत्तराच्या सेशनदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आमने-सामने आले होते.
IPL 2024: बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघ मैदानात अत्यंत तणावात असला तरी मैदानाबाहेर मात्र खेळाडू मनमोकळेपणाने आनंद लुटताना दिसत आहेत. नुकतंच एका प्रश्नोत्तराच्या सेशनदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आमने-सामने आले होते. यावेळी विराट कोहलीने एका प्रश्नावर 'तुझी बायको' असं उत्तर दिलं असता दिनेश कार्तिक काही वेळासाठी अनुत्तरित झाला होता. बंगळुरुने एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
विराट कोहली आणि दिनेश कार्तिकसह फाफ डू प्लेसिस, मोहम्मद सिराज आणि रजत पाटीदार प्रश्नोत्तराच्या या सेशनमध्ये सहभागी झाले होते. दिनेश कार्तिकने यावेळी त्याच्या सहकाऱ्यांना क्रिकेट व्यतिरिक्त त्याचा आवडता खेळाडू कोणता? असा प्रश्न विचारला. यावर विराट कोहलीने लगेच त्याची बायको दीपिका पल्लीकलं नाव घेतलं. हे उत्तर ऐकल्यानंतर दिनेश कार्तिक काही वेळासाठी स्तब्ध झाला. यानंतर मात्र सगळ्यांनाच हसू अनावर झालं. दिनेश कार्तिकने यानंतर आपण विराटशी सहमत आहोत, पण डोक्यात वेगळंच उत्तर होतं अशी कबुली दिली.
दीपिका सुप्रसिद्ध स्क्वॉशपटू आहे. तिने कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. देशातील आघाडीच्या स्क्वॉ खेळाडूंमध्ये तिची गणना होते.
दिनेश कार्तिक - क्रिकेटर वगळता माझा आवडता खेळाडू कोण?
विराट कोहली - तुझी बायको?
दिनेश कार्तिक - हे नक्कीच चांगलं उत्तर आहे. पण माझ्या डोक्यात वेगळंच उत्तर होतं. तू मला पूर्णपणे तावडीत पकडलंस, शपथ.
RCB संघ गुणतालिकेत तळाशी
बंगळुरुच्या चाहत्यांची या हंगामातही मोठी निराशा झाली आहे. 8 सामन्यांपैकी 7 सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला आहे. रविवारी कोलकाताना नाईट रायडर्सने एका धावेने बंगळुरुचा पराभव केला. यासह बंगळुरु संघ गुणतालिकेत तळाशी पोहोचला आहे. बंगळुरुच्या नावे 8 सामन्यानंतर फक्त 2 गुण आहेत. त्याने नेट रन रेट -1.046 आहेत. खराब कामगिरीमुळे बंगळुरु संघाचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न आता अडथळ्यांनी भरलेलं आहे, पण अशक्य नाही. पण आता संघाचं भविष्य पूर्णपणे त्यांच्या हातात नाही.
बंगळुरु संघाचे या हंगामातील 6 सामने शिल्लक आहेत. सहाही सामने जिंकल्यास त्यांची गुणसंख्या 14 होईल. सामान्यपणे एखाद्या संघाला प्लेऑफ स्टेजला पोहोचायचं असेल तर 16 गुणांची गरज असते. पण एखादा संघ 14 गुणांसहही प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. पण यासाठी इतर सामन्यांचे निकाल त्यांच्यासाठी अनुकूल असणारे हवेत.
त्यामुळे आता बंगळुरु संघासमोर एकच मार्ग आहे. ते म्हणजे सर्वच्या सर्व 6 सामने जिंका आणि इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहा. जर इतर सामन्यांच्या निकालाने अटीतटीची स्थिती निर्माण झाली तर बंगळुरु संघ 14 गुणांसह टॉप 4 संघात दाखल होऊ शकतो.