IND vs NZ: विराट-विलियम्सनच्या या फोटोचं जगभरातून होतंय कौतुक
एकीकडे कांटे की टक्कर दुसरीकडे खेळ भावना
मुंबई : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात जेव्हा 'कांटे की टक्कर' सुरु होती तेव्हा एक वेगळंच चित्र मैदानावर पाहायला मिळालं. (India vs New Zealand) टी20 सीरीजमध्ये ही गोष्ट नेहमी आठवणीत राहिल. ही सीरीज तशीही क्रिकेट चाहत्यांसाठी रोमांचक ठरली आहे. भारताने ही सीरीज 5-0 ने जिंकली आणि इतिहास रचला. शेवटच्या सामन्यात दोन्ही संघाचे कर्णधार खेळत नव्हते. पण दोघेही एकत्र बसून सामन्याचा आनंद घेत होते. विराट कोहली आणि केन विलियम्सन यांचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
टीम इंडियाने टॉस जिंकत आधी बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने हा सामना ७ रनने जिंकला. या सामन्यात केन विलियम्सन दुखापतीमुळे खेळत नव्हता तर विराटला ही विश्रांती देण्यात आली होती. पण दोन्ही कर्णधार मैदानावरच उपस्थित होते. दोघांची ही कृती पाहून सगळ्यांची त्यांचं कौतूक ही केलं. खेळ भावना काय असते यांचं आणखी एक उदाहरण या दोन्ही कर्णधारांनी दाखवून दिलं.
सीरीजच्या आधी विराट कोहलीने म्हटलं होतं की, न्यूझीलंडचे लोकं इतके चांगले आहेत की, त्यांच्याकडून बदला घेण्याचा विचार देखील करु शकत नाही. वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. याबाबतच्या प्रश्नावर विराटने हे उत्तर दिलं.