दुबई : यंदाच्या वर्षीही विराट कोहली आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. विराटच्या नेतृत्वाखाली बंगळूरूचा हा शेवटचा सीझन होता. सध्या विराट टी-20 वर्ल्डकपच्या तयारी करतोय. आता सोशल मीडियावर विराटचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये विराट कोहली दोरीने बांधलेल्या खुर्चीवर बसलेला दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी विराटने हा फोटो शेअर केला आहे. याला त्याने अप्रतिम असं कॅप्शनंही दिलं आहे. यामध्ये बबलमध्ये खेळत असताना काही प्रमाणात असं वाटतं, हे लिहिलंय.


हा फोटो बघून असं दिसतंय की विराटने तो जाहिरातीसाठी काढला आहे. परंतु जर तुम्हाला फोटोमागील मेसेज असा आहे की, बायो बबलमध्ये खेळणं खेळाडूंसाठी अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण आहे.



जगभरात पसरलेल्या कोरोना साथीपासून संरक्षण करण्यासाठी खेळाडूंना बायो बबलमध्ये राहावं लागतंय. गेल्या काही काळापासून सर्वत्र आणि प्रत्येक स्पर्धेत त्याचं पालन केलं जातंय. ही संपूर्ण व्यवस्था खेळाडूंसाठी अतिशय आव्हानात्मक आहे. परंतु जोपर्यंत कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत बायो बबलशिवाय दुसरा मार्ग नाही.


कोहली सध्या आगामी टी -20 वर्ल्डकपसाठी दुबईत थांबला आहे. आणि टीम इंडियाच्या बायो बबलमध्ये सामील झाला आहे.