धोनी कर्णधारपद सोडणार हे कोहलीला आधीच कळालं होतं.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे की, महेंद्र सिंग धोनी कर्णधारपद सोडणार हे त्याला दीड महिना आधीच माहित होतं. जेव्हा कोहलीला ही गोष्ट कळाली तेव्हा तो मोहालीमध्ये टेस्ट खेळत होता.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे की, महेंद्र सिंग धोनी कर्णधारपद सोडणार हे त्याला दीड महिना आधीच माहित होतं. जेव्हा कोहलीला ही गोष्ट कळाली तेव्हा तो मोहालीमध्ये टेस्ट खेळत होता.
एका मुलाखतीत कोहलीने म्हटलं की, जेव्हा त्याला हे सांगण्यात आलं की, टेस्टनंतर वनडे आणि टी-20 फॉरमॅटचं कर्णधारपद देखील त्याला दिलं जाणार आहे तर तो इमोशनल झाला. यावेळेस त्याची गर्लफ्रेंड अनुष्का देखील त्याच्या सोबत होती.
४ जानेवारी २०१७ ला धोनीने कर्णधारपद सोडल्याची बातमी आली. धोनीने बीसीसीआयला ईमेलकरून त्याच्या राजीनामा पाठवला. तेव्हा असं म्हटलं गेलं होतं की, धोनीने जशी टेस्टचं कर्णधारपद सोडलं तसं वनडे आणि टी20 चं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय देखील अचानक घेतला. पण विराटच्या म्हणण्यानुसार मोहाली टेस्टदरम्यानच त्याला ही गोष्ट कळाली होती. टीम इंडिया २६ ते २९ नोव्हेंबरपर्यंत इंग्लंड विरोधात मोहाली टेस्ट खेळत होती.