Virat Kohli Laptop Video: विराट कोहलीसाठी 20 जून हा दिवस खूप खास आहे. या दिवशी कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विराट कोहलीने 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्ध सबिना पार्कवर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या खास प्रसंगी कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने लॅपटॉप चालू करून खास फोटो शेअर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीला 2011 मध्ये पहिल्यांदा पांढऱ्या जर्सीमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या कसोटीच्या पहिल्या डावात कोहलीला 4 तर दुसऱ्या डावात फक्त 15 धावा केल्या होत्या. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 11 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो लॅपटॉप चालू करतो आणि पासवर्ड टाकतो. एका फोल्डरमध्ये तो क्लिक करतो त्याची कसोटी क्रिकेटची छायाचित्रे ठेवलेली दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.



कोहलीची कसोटी कारकीर्द


भारतासाठी 100 कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचा समावेश आहे, त्याने भारतासाठी आतापर्यंत 101 कसोटी सामने खेळले आहेत. कोहलीने कसोटी सामन्यांमध्ये 7 द्विशतके, 27 शतके आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने 8043 धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार देखील विराट कोहली आहे.