मुंबई  : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) गेल्या अनेक वर्षापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. त्याला गेल्या अडीच वर्षापासून शतक ठोकता आलं नाहीए. अनेक सामन्यात संधी मिळाल्या आहेत मात्र या संधीच तो सेंच्यूरीत रुपांतर करू शकला नाही. त्यामुळे सतत तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. आता पुन्हा एकदा त्याला ट्रोलर्सने घेरले आहे. 1000 दिवस असं पोस्ट करून विराटला ट्रोल केलं जातंय. या 1000 दिवसांचा विराटशी संबंध काय ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इग्लंड बर्मिंग आर्मी या ट्विटर अकाऊंटवरून 1000 डेज अशा आशयाचं ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी विराट कोहीलीला  (Virat Kohli)  ट्रोल केल्याचं बोललं जातंय. कारण या ट्विटच्या खालोखाल विराटचे फॅन्स इग्लंडला ट्रोल करताना दिसत आहे. मात्र 1000 डेजचा अर्थ काय ते जाणून घेऊयात. 
 
1000 डेज?
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने  (Virat Kohli)  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावून आज 1000 दिवस पूर्ण झाले आहेत. कोहलीचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी झाले. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने 136 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोहलीचे  (Virat Kohli)  हे 70 वे शतक होते. मात्र त्यानंतर 71 वा शतक होण्यास खुपच विलंब झाला आहे. साधारण आता 1000  दिवस उलटले आहेत, मात्र अद्याप त्याच्या बॅटीतून शतक आले नाही. त्यामुळे त्याला ट्रोल करण्यासाठी 1000 डेजचा ट्रेंड वापरण्यात आला आहे.  


सर्वाधिक शतके
सचिन तेंडुलकर - 664 सामने 34357 100 शतके
रिकी पाँटिंग - 560 सामने, 27483 धावा, 71 शतके
विराट कोहली - 463 सामने, 23726 धावा, 70 शतके
कुमार संगकारा - 594 सामने, 28016 धावा 63 शतके
जॅक कॅलिस - 519 सामने, 25534 धावा, 62 शतके


वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीला  (Virat Kohli)  विश्रांती देण्यात आली होती. तसेच सध्याच्या झिम्बाब्वे दौऱ्यावरही तो संघाचा भाग नाही. आता कोहली थेट आशिया कपच्या माध्यमातून संघात प्रवेश करेल. आशिया चषक या महिन्याच्या 27 तारखेपासून सुरू होत असून 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्या स्पर्धेत भारताला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात तर विराटचा फॉर्म परत येतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विराटची बॅटीतून धावा न आल्यास टीम इंडियासाठी आशिया कप खुपच अवघड जाणार आहेत.