नवी दिल्ली : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरोधात सहावी आणि सीरिजमधील शेवटची मॅच जिंकत ५-१ने सीरिज आपल्या नावावर केली. या मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहली याने तुफानी इनिंग खेलत ३५वी सेंच्युरी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने २०५ रन्सचं लक्ष्य ३२.१ ओव्हर्समध्येच गाठत विजय मिळवला. विराट कोहलीने ९६ बॉल्समध्ये नॉट आऊट १२९ रन्सची इनिंग खेळली. या सीरिजमधील ही विराट कोहलीची तिसरी सेंच्युरी आहे.


३५ वी सेंच्युरी करत विराट कोहलीने आपल्या नावावर ५ असे रेकॉर्ड्स केले जे येत्या काळात इतर खेळाडूंना तोडणं खूपच कठीण दिसत आहे. पाहूयात काय आहेत हे रेकॉर्ड्स...


१) रोहितचा रेकॉर्ड तोडला 


टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने वन-डे क्रिकेट सीरिजमध्ये ५०० रन्स बनवले. यासोबतच त्याने रोहित शर्माचा रेकॉर्ड तोडला. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरोधात २०१३-१४ मध्ये ६ मॅचेसच्या सीरिजमध्ये ४८१ रन्स केले होते.


२) सर्वात वेगवान १७००० रन्स 


विराटने सहाव्या वन-डे मॅचमध्ये सेंच्युरी लगावत सर्वाधिक वेगाने १७००० रन्स पूर्ण केले आहेत. त्याने आफ्रिकन बॅट्समन हाशिम आमला याला मागे टाकलं आहे. आमलाने ३८१ इनिंग्समध्ये १७००० रन्स केले होते. तर, विराटने ३६३ इनिंग्समध्ये १७००० रन्स केले.



३) सीरिजमध्ये ५०० रन्स बनवणारा पहिला खेळाडू 


द्विपक्षीय सीरिजमध्ये ५०० रन्स बनवणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. सर्वात आधी द्विपक्षीय सीरिजमध्ये ३०० रन्स बनवण्याचा रेकॉर्ड जहीर अब्बास यांनी १९८२ मध्ये भारताविरोधात केला होता. त्यानंतर १९८५ मध्ये वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेंसने ४०० रन्सचा कारनामा केला. आता विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सीरिजमध्ये ५०० रन्स केले आहेत. एका सीरिजमध्ये इतके रन्स बनवणारा तो पहिला बॅट्समन ठरला आहे.



४) कॅप्टनची सर्वात वेगाने सेंच्युरी


कॅप्टन म्हणून सर्वात वेगवान सेंच्युरी बनवणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली दाखल झाला आहे. ज्या वेगाने विराट खेळत आहे तो पाहता लवकरच रिकी पाँटिंगलाही मागे टाकेल असे दिसत आहे. रिकी पाँटिंगने कॅप्टन असताना २२० इनिंग्समध्ये २२ सेंच्युरी केल्या आहेत. तर विराटने कॅप्टन असताना ४६ इनिंग्समध्ये १३ सेंच्युरी केल्या आहेत. 


५) संगकाराला झटका 


विराट कोहलीचे आतापर्यंत ३९ सेंच्युरी झाल्या आहेत. मात्र, यासाठी त्याने २३३ इनिंग्स खेळल्या आहेत. तर इतक्या सेंच्युरी करण्यासाठी कुमार संगकाराने ५०० इनिंग्स खेळल्या होत्या. सचिन तेंडुलकरने ५३८ इनिंग्स खेळत ६० सेंच्युरी लगावल्या आहेत.