नवी दिल्ली : टीम इंडियाने श्रीलंके विरूद्धच्या तिस-या आणि शेवटच्या टेस्टमध्ये श्रीलंकेला १७१ रन्सने मात दिली आहे. यासोबतच टीम इंडियाने ही सीरीज ३-० ने आपल्या खिशात घातली आहे. भारताच्या पहिल्यांदाच तीन सामन्यांच्या सीरीजमध्ये एखाद्या देशाला आपल्या देशाबाहेर नमवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेला हरवून यासोबतच विराट कोहलीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने भारतीय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव नोंदवलं आहे. तीन टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलेल्या टीम इंडियाने पाल्लकेले टेस्टमध्ये विजय मिळवत टेस्ट क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास लिहिला आहे. विराट ब्रिगेडने आपल्या नावावर एक असा रेकॉर्ड नोंदवला आहे, जो आतपर्यंत टीम इंडियाचा एकही कर्णधार करू शकला नाही. 


कपिल देव, सौरव गांगुली, महेंद्र सिंह धोनी, मोहम्मद अझरूद्दीन सारखे कर्णधार सुद्धा हा रेकॉर्ड करू शकले नाहीत. मात्र, कर्णधार विराट कोहलीने हे शक्य करून दाखवलं आहे. भारताने पहिल्यांदाच परदेशात ३-० ने सीरीज जिंकली आहे. टीम इंडियाच्या ८५ वर्षाच्या टेस्ट इतिहासामध्ये एकही कर्णधार परदेशात तीन किंवा त्यापेक्षा जास्त टेस्ट सामन्यांमध्ये सीरीजमध्ये पूर्णपणे विजय मिळवला नव्हता. 


इंडियाने २००४ मध्ये बांगलादेश आणि २००५ मध्ये झिम्बॉंबे मध्ये सीरीज जिंकली होती, मात्र ती केवळ २ सामन्यांची सीरीज होती. यावेळी विराटच्या टीमने ३-० ने विजय मिळवला आहे. 


त्याआधी १९६७ मध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये ४ टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये ३-१ ने विजय मिळवला होता. ही एकुलती एक सीरीज आहे ज्यात टीम इंडियाने टेस्ट सीरीजमध्ये ३ टेस्ट जिंकल्या होत्या. आता ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताने ३ टेस्ट जिंकल्या आहेत.