मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आपल्या दमदार बॅटिंगच्या जोरावर पुन्हा एकदा विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर झाला आहे. तसंच वनडेमध्ये भारतीय महिला टीमची कॅप्टन मिताली राजचीही या पुरस्कासारासाठी निवड करण्यात आली आहे. विराटच्या नेतृत्वात भारतानं २०१७ मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केलं. यावर्षी विराटही जोरदार फॉर्ममध्ये होता. २०१७मध्ये विराटनं सगळ्या फॉरमॅटमध्ये २,८१८ रन्स केले होते. २०१६मध्येही विराटनं सर्वाधिक रन्स केले होते.


सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटनं यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जो रूटपेक्षा ७०० रन्स आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या स्टिव्ह स्मिथपेक्षा १ हजार रन्स जास्त केल्या आहेत. याचबरोबर विराटनं सेहवागच्या रेकॉर्डशीही बरोबरी केली आहे. सेहवागनं २००८ आणि २००९मध्ये सर्वाधिक रन्स केले होते. यावर्षी विराटनं टेस्ट क्रिकेटमध्ये ७५ च्या सरासरीनं १,०५९ रन्स तर वनडेमध्ये ७६ च्या सरासरीनं कोहलीनं १,४६० रन्स केल्या.


५ महिला क्रिकेटपटूंचाही समावेश


या यादीमध्ये ५ महिला क्रिकेटपटूंचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इंग्लंडच्या ३ खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंडच्या टीमनं मागच्या वर्षी वर्ल्ड कप जिंकला होता. याचबरोबर भारताच्या मिताली राजचीही या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये १९१वी मॅच खेळल्यावर मिताली ही सर्वाधिक वनडे खेळणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे. तसंच लागोपाठ ७ अर्धशतकं झळकावण्याचा रेकॉर्डही मितालीच्या नावावर आहे.