Virat Kohli Mother Health Update : सध्या टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये (India vs England Test series) कसोटी मालिका खेळवली जात आहे. मात्र, या दोन्ही कसोटी सामन्यांपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या दोन कसोटीनंतर बाहेर पडला होता. विराट कोहलीच्या आईची तब्येत खराब असल्याने खेळणार नसल्याचं बोललं जात होतं. अशातच आता विराट कोहलीच्या भावाने मोठी अपडेट दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत विकास कोहलीने (Vikas kohli) माहिती दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला विराटचा भाऊ?


माझ्या लक्षात आलं आहे की आमच्या आईच्या तब्येतीची ही खोटी बातमी आजूबाजूला फिरत आहे, मला स्पष्ट करू इच्छितो की आमची आई पूर्णपणे तंदुरुस्त आणि ठीक आहे. तसेच मी सर्वांना आणि प्रसारमाध्यमांना विनंती करतो की, योग्य माहितीशिवाय अशा बातम्या पसरवू नयेत, असं विराटचा भाऊ विकास कोहली याने सांगितलं आहे.



तिसऱ्या टेस्टला विराट खेळणार?


पहिल्या दोन टेस्ट सामन्यांमध्ये विराटने रजा माहिती होती. बीसीसीआयने त्याच्या खासगी आयुष्याचा आदर करत त्याची सुट्टी मंजूर केली होती. अशातच आता तिसऱ्या कसोटीत विराट पुनरागमन करू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाला दुसऱ्या डावात किरकोळ 231 धावा देखील करता आल्या नाहीत. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीत देखील टीम इंडिया विराट शिवाय मैदानात गाजवेल का? असा सवाल विचारला जातोय.


दरम्यान, विझाग येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माला विराट कोहलीची कमरता नक्की जाणवेल. एकीकडे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर चांगलं प्रदर्शन करत नसल्याने दोन्ही खेळाडू तिसऱ्या कसोटीतून बाहेर होण्याची शक्यता आहे. तर रोहित शर्मा 4 स्पिनर्ससोबत मैदानात उतरेल का? असा सवाल देखील विचारला जातोय. 


पाहा टीम इंडियाचा संपूर्ण स्कॉड -


रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (WK), ध्रुव जुरेल (WK), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.


इंग्लंडचा संपूर्ण संघ -


बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक) ), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.