Virat Kohli to RCB Womens Team: महिला प्रिमीयर लीगमध्ये (WPL 2023) नुकंतच रॉयल चॅलेंजर बंगळूरूने (Royal Challengers Bangalore) त्यांच्या पहिल्या विजयाची नोंद केली. आरसीबीने (RCB Womens) युपी वॉरियर्सचा 5 विकेट्सने पराभव करत या सिझनमधील पराभवांची मालिका संपुष्टात आणली. पहिल्यांदाच भारतीय महिला आणि विदेशी महिला यांच्यामध्ये प्रिमीयर लीग खेळवण्यात येत असून चाहतेही याचा आनंद घेतायत. दरम्यान सतत होणाऱ्या पराभवामुळे आरसीबीच्या महिलांची टीम काहीशी हताश झाली होती. मात्र यावेळी आरसीबी पुरूषाच्या टीमचा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) ने महिलांची भेट घेऊन त्यांचं मनोबल उंचावलंय.


Virat Kohli ने आरसीबीच्या महिलांना दिला जिंकण्याचा मंत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीच्या महिलांनी या बुधवारी युपी वॉरियर्सच्या महिलांचा 5 विकेट्सने पराभव केला. 6 सामन्यांमध्ये आरसीबीने पहिल्या विजयाची नोंद केली. यापूर्वी खेळलेल्या पाचही सामन्यात आरसीबीच्या महिलांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच विराट कोहली (Virat Kohli) ने आरसीबीच्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी खास मेसेज दिला. 


आरसीबी महिला टीमशी बोलताना विराट कोहली म्हणाला, मी गेल्या 15 वर्षांपासून आयपीएल खेळत असून मी आतापर्यंत जिंकलो नाही. मात्र हे मला उत्साहित करण्यापासून रोखू शकत नाही. मी केवळ असाच प्रयत्न करू शकतो. सतत याच गोष्टीचा विचार करू नका, की हे किती वाईट आहे. 



आरसीबीच्या टीमचा पहिला विजय


काल आरसीबी विरूद्ध युपी वॉरियर्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना हिने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीच्या गोलंदाजीसमोर प्रथम फलंदाजी करताना युपीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. युपीने 20 ओव्हर्समध्ये केवळ 135 रन्स केले. आरसीबीकडून अ‍ॅलिसा पॅरीने 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय सोफी डेव्हाईन आणि आशोभनाने 2-2 विकेट घेतल्या.


18 व्या ओव्हरमध्ये जिंकला सामना


यानंतर आरसीबी फलंदाजीला आली आणि 18 व्या ओव्हरसा सामना जिंकला. या सामन्यात युपीचा 5 विकेट्स राखून पराभव केला. दरम्यान आरसीबीच्या टीमला प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान हा आरसीबीचा पहिला विजय होता.