MS Dhoni, Virat Kohli: टीम इंडिया (Team India) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे रोहित, विराट, सुर्यकुमारचं कौतूक होताना दिसतंय. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli), तसेच रोहित शर्मा (Rohit Sharma) ट्रोलर्सच्या निशाण्यावर असल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या यांच्या कुटुंबियांवर गलिच्छ कमेंट करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर खेळाडूंच्या मुलीला आणि पत्नीला अश्लिल भाषेत कमेंट्स केल्या आहेत. (virat kohli ms dhoni rohit sharma daughters comments police file fir after delhi women commission chief swati maliwal orders marathi news)


दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (delhi women commission chief swati maliwal) यांच्या नोटीसनंतर क्रिकेटपटू एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या मुलींबद्दल असभ्य भाषेत कमेंट करणाऱ्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.



दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून (Police file FIR) तपास सुरू केलाय. याअंतर्गत पोलिसांनी ट्विटरवरून या दोन्ही मुलींविरोधात अभद्र भाषेत कमेंट्स करणाऱ्या अकाऊंटची माहिती मागवली आहे. यासाठी पोलिसांनी ट्विटरला नोटीसही बजावल्याची माहिती समोर आली आहे.


आणखी वाचा - भोगा आपल्या कर्माची फळं...; शिवीगाळ आणि दादागिरीनंतर Hardik Pandya ला टीममधून बाहेरचा रस्ता!


दरम्यान, सोशल मीडियावर लहान मुले आणि त्यांच्या आईंसाठी अश्लील, महिलाविरोधी आणि अत्यंत अपमानास्पद पोस्ट टाकल्या जातात. ही अत्यंत गंभीर बाब असून त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी केली आहे. त्यामुळे आता काही नेटकऱ्यांनी टीका करणाऱ्यांवर सुनावल्याचं देखील दिसतंय.