मुंबई : उद्या टीम इंडिया श्रीलंकेविरूद्ध दुसरा टेस्ट सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी पहिल्यांदाच रोहित शर्मा कर्णधार म्हणून पिंक-बॉल टेस्टचं नेतृत्व करणार आहे. एकूण तीन पिंक बॉल टेस्ट झाल्या असून यापूर्वी दोन वेळा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सामने खेळले गेले आणि या दोघांमध्येही टीम इंडियाने विजय मिळवला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान उद्याचा सामनाही विराटसाठी महत्त्वपूर्ण सामना असणार आहे. दीर्घकाळापासून विराटचा बॅट शांत आहे. त्याचे चाहते त्याच्या 71 व्या शतकाची वाट पाहतायत. मात्र विराटसाठी शतक तर दूरच त्याने या सामन्यात 42 रन्स करणं अधिक महत्त्वाचं झालं आहे.


विराट कोहलीला उद्याच्या सामन्यात 42 रन्स करणं खूप गरजेचं आहे. यामुळे विराट त्याची सरासरी 50 राखू शकणार आहे. विराट कोहलीच्या जवळपास अर्ध्या टेस्टच्या कारकिर्दीत प्रथमच हा धोका त्याच्यासमोर उभा आहे. 


विराट कोहलीने आतापर्यंत 100 टेस्ट सामन्यांच्या 169 डावांमध्ये 50.35 च्या सरासरीने 8007 रन्स केले आहेत. जून 2011 मध्ये त्याने टेस्ट कारकिर्दीला सुरुवात केली आणि क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये फलंदाजीने त्याचं वर्चस्व दाखवून दिलं आहे.


मोहाली टेस्टमध्येही विराट 45 रन्सवर आऊट झाला होता. त्यामुळे आता बंगळूरू टेस्टमध्ये सरासरी 50 राखण्यासाठी 42 रन्सची गरज आहे. जर विराटने यापेक्षा कमी रन्स केले तर गेल्या 49 टेस्ट सामन्यामध्ये पहिल्यांदा त्याची सरासरी 50 पेक्षा खाली येईल. 


विराटचा खेळा गेल्या काही त्याच्या फॉर्मला साजेशा नाहीये. विराटने 2020 च्या सुरुवातीपासून ते मोहाली टेस्टपर्यंत 16 टेस्ट सामन्यांमध्ये 28च्या सरासरीने केवळ 805 रन्स केले आहेत. दरम्यान विराटच्या नावावर 28 डावांमध्ये फक्त 6 अर्धशतकं आहेत, मात्र त्याच्या नावे एकाही शतकाची नोंद नाही.