Virat Kohli: विराटने कुणाच्या सांगण्यावरून कॅप्टन्सी सोडली? सौरव गांगुलीचा मोठा खुलासा!
Indian Cricket Team: विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडलं, तेव्हा BCCI ची काहीच तयारी नव्हती. त्या परिस्थितीत रोहित शर्मा आमच्याकडे उत्तम पर्याय होता, असं गांगुली म्हणाला आहे.
Sourav Ganguly On Virat Kohli: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यावर टीका होत आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माच्या कॅप्टन्सीच्या राजीनाम्याची मागणी देखील सोशल मीडियावर केली जात आहे. तर विराट कोहलीला पुन्हा कॅप्टन करावं, अशा मागणीने देखील जोर धरलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीने टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) मोठा खुलासा केला आहे.
कुणाच्या सांगण्यावरून कॅप्टन्सी सोडली?
भारतीय कसोटी संघाचे (Indian Cricket Team) कर्णधारपद सोडण्याचा निर्णय स्वतः विराटचाच होता, असा खुलासा सौरव गांगुलीने केला आहे. त्याने स्वत:च भारताचा 1-2 ने पराभव झाल्यानंतर कसोटी कर्णधारपद सोडलं होतं, असंही गांगुलीने (Sourav Ganguly On Virat Kohli) म्हटलं आहे. त्यावेळी त्याने रोहित शर्माला कॅप्टन्सी का सोपवली गेली याचा देखील खुलासा केला आहे. (Sourav Ganguly clearly said bcci was not prepared for virat kohli leaving india test captaincy)
आणखी वाचा - World Cup पूर्वी टीम इंडियाचं शेड्यूल जारी; BCCI ची मोठी घोषणा!
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडलं, तेव्हा BCCI ची काहीच तयारी नव्हती. त्या परिस्थितीत रोहित शर्मा आमच्याकडे उत्तम पर्याय होता. मला रोहित शर्माच्या नेतृत्वावर अत्यंत विश्वास होता. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं गेलं, असं गांगुली म्हणतो.
गांगुलीचं अजब वक्तव्य
आयपीएल जिंकणं हे वर्ल्ड कप जिंकण्यापेक्षाही अवघड काम आहे आणि पाचवेळा आयपीएल चॅम्पिअन होणे छोटी गोष्ट नाही, असं म्हणत गांगुलीने रोहित शर्माचं कौतूक केलंय. आयपीएलमध्ये आपल्याला 14 सामने खेळावे लागतात .तसेच प्लेऑफमध्ये चांगली कामगिरी करून फायनलमध्ये जावं लागतं, त्या तुलनेत आयपीएल जिंकणं अवघड आहे, असं गांगुलीने म्हटलं आहे. त्याचबरोबर आजही रोहित शर्मा चांगली कॅप्टन आहे, असं म्हणत गांगुलीने रोहित शर्माचा बचाव केलाय.