विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत २ ऑक्टोबरपासून ३ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप सुरु झाल्यानंतरची दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच सीरिज आहे. या सीरिजवरच भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहणं अवलंबून आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे या सीरिजमध्ये अनेक रेकॉर्ड करण्याची संधी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने ७९ टेस्ट मॅचच्या १३५ इनिंगमध्ये ६,७४९ रन केले आहेत. यामध्ये २५ शतकांचा समावेश आहे. विराटने यातल्या ७५८ रन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केल्या आहेत. सध्याच्या टीममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक रन करणाच्या रेकॉर्डही विराटच्या नावावर आहे.


भारताकडून सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक रन केले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिन, द्रविड आणि सेहवाग या ३ खेळाडूंनीच १ हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. या दिग्गजांच्या यादीत सामील होण्यासाठी विराटला २४२ रनची गरज आहे.


सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २५ टेस्टमध्ये १,७४१ रन केले. तर सेहवागने १,३०६, द्रविडने १,२५२, व्हीव्हीएस लक्ष्मणने ९७६, सौरव गांगुलीने ९४७ रन केले आहेत. तर मोहम्मद अजहरुद्दीनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७७९ रन करता आले.