कोहलीने सांगितलं चौथ्या वनडेतील पराभवाचं कारण
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चौथ्या वनडेमध्ये पराभव झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
जोहान्सबर्ग : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चौथ्या वनडेमध्ये पराभव झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
वनडेचं रुपांतर टी-20 मध्ये
पावसामुळे ओव्हर कमी झाले आणि वनडे मॅच टी-20 मॅचमध्ये रुपांतरीत झाली. ज्याचा फायदा आफ्रिकेला झाला. कोहलीने म्हटलं की, जर ओव्हर कमी नसते झाले तर निकाल वेगळा असता. आम्ही काही संधी देखील गमावल्या.'
मिलर आणि क्लासेनची बाजी
शनिवारी चौथ्या वनडेमध्ये आफ्रिकेने टीम इंडियावर 5 विकेटने विजय मिळवला. भारत या सिरीजमध्ये 3-1 ने पुढे आहे. सामन्यानंतर कोहलीने म्हटलं की, 'एबी डिविलियर्सला आऊट केल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की मॅच आमच्या हातात आहे. पण मिलर आणि क्लासेनने बाजी मारली.'
पावसानंतर परिस्थिती बदलली
कोहलीने म्हटलं की, 'पावसानंतर जेव्हा खेळ सुरु झाला तेव्हा विकेट बॅँटींगसाठी आधी सारखी राहिली नव्हती. दक्षिण आफ्रिका क्वालिटी टीम आहे. ती एवढ्या लवकर पराभव स्विकारणार नाही. पण पुढच्या सामन्यात आम्ही देखील अजून जोर लावू.' पांचवी वनडे 13 फेब्रवारीला एलिजाबेथ येथे होणार आहे.