`महान खेळाडूने रणजी ट्रॉफी...`,भारतीय क्रिकेटरची पुन्हा एकदा विराटवर टीका
हे तर अतीच झाले, इतक्या वाईट शब्दात विराटवर टीका, कोण आहे `हा` भारतीय क्रिकेटपटू
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. गेल्या अडीच वर्षापासून त्याला एक शतकही ठोकता आले नाही आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.तसेच अनेक भारतीय क्रिकेटर त्याच्यावर टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा एका भारतीय क्रिकेटरने त्याच्यावर टीका केली आहे.
1983 विश्वचषक विजेता कपिल देव याने पुन्हा एकदा विराटच्या फॉर्मवर भाष्य केले आहे. तो म्हणतो की, कोहली अद्याप फॉर्ममध्ये नाही, परंतु तो सर्वोत्तम फलंदाज आहे. अशा खेळाडूने पुन्हा फॉर्ममध्ये येऊन संघासाठी योगदान द्यावे अशी माझी इच्छा आहे. फलंदाजीत पुनरागमन करण्यासाठी त्याला स्वत:चा मार्ग शोधावा लागेल. विश्वचषक जवळ आला असून त्याच्यासाठी फॉर्ममध्ये येणे महत्त्वाचे आहे असल्याचे त्याने म्हटलेय.
कपिल पुढे म्हणाला की, 'त्याने रणजी ट्रॉफी खेळावी किंवा कुठेही धावा कराव्यात. विराटला आत्मविश्वास परत आणण्याची गरज आहे. हा एक महान आणि चांगला खेळाडूमधला फरक आहे. तसेच त्याच्यासारख्या महान खेळाडूला फॉर्ममध्ये येण्यासाठी इतका वेळ लागू नये, अशी टीका त्यांनी केली आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर कोहलीला वगळण्यावर कपिल म्हणाला, विराट कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूला वगळावे असे मी म्हणू शकत नाही. त्याला आदर देण्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे असे जर तुम्ही म्हटले असेल तर त्यात गैर काहीच नाही.सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा खेळाडूला फॉर्ममध्ये कसे आणायचे? तो काही सामान्य क्रिकेटपटू नाही. त्याचा फॉर्म परत मिळवण्यासाठी त्याने अधिक सराव करावा आणि अधिक सामने खेळावेत, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.